बॉयफ्रेंड राकेश बापट पाठोपाठ शमिता शेट्टी अचानक रुग्णालयात दाखल?
`बिग बॉस १५`च्या टिआरपीवर आधीपासूनच संकट कोसळलं आहे.
मुंबई : 'बिग बॉस १५'च्या टिआरपीवर आधीपासूनच संकट कोसळलं आहे. यामध्येच आता एक शॉकिंग न्यूज समोर येतेय. एका रिपोर्ट्सनुसार राकेश बापट आणि शमिता शेट्टीची तब्बेत अचानक बिघडली आणि ती या शोमधून बाहेर पडली आहे. एका वृत्तनुसार शमिताच्या बिघडलेल्या तब्बेतीमुळे तिला मेडिकल ग्राऊंडसाठी घराच्या बाहेर आणण्यात आलं आहे.
शोमधून आऊट शमिता शेट्टी?
बिग बॉसच्या अनेक फॅनपेजवर शमिता बाहेर पडल्याची बातमी सध्या व्हायरल होत आहे. मात्र कारण एलिमिनेशन नाही तर शमिता शेट्टीची हेल्थ आहे. शमिताला मेडिकल ग्राऊंड्सवर उपचारांसाठी घराच्या बाहेर आणण्यात आलं आहे. एका रिपोर्टनुसार, मंगळवार आणि बुधवारी उपचारानंतर शमिता शोमध्ये पुन्हा परत येवू शकते. मात्र याविषयी चॅनलकडून अद्याप तरी कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
शमिताआधी राकेश-अफसाना शोमधून बाहेर
शमिताआधी एक्ट्रेसचं कनेक्शन आणि वाईल्ड कार्ड कंटेस्टेंट राकेश बापटला किडनी स्टोनचा त्रास होण्याच्या कारणामुळे शोच्या बाहेर आणण्यात आलं. यानंतर चाकूनने स्वत:वर वार केल्यामुळे अफसानालादेखील शोमधून एलिमिनेट करण्यात आलं होतं.
फॅन्सला इंप्रेस करण्यात फेल होतंय बिग बॉस १५
बिग बॉसची टीआरपी पहिल्यापासूनच संकटात आहे. अशामध्येच स्ट्राँग कंटेस्टेंट शमिता शेट्टीच्या बाहेर जाण्यामुळे शोच्या रेटिंगवर याचा परिणाम होवू शकतो. बिग बॉसचा हिट शोविषयी लोकांना इंप्रेस करण्यासाठी फिकं पडत आहे.