मुंबई : 'ब्रास अगेंस्ट' या बँडमधील लोकप्रिय गायिका सोफिया उरिस्ता हिनं केलेली एक कृती सध्या सर्वांनाच धक्का देत आहे. आपण केलेल्या या कृतीबद्दल तिनं माफीही मागितली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोफिया उरिस्तानं केलेलं हे कृत्य सध्या सगळीकडेच चर्चेचा विषय ठरत आहे. ज्यासाठी तिनं पोस्ट लिहित माफीही मागितली.


व्यासपीठावर वावरताना आपण कायमचकाही मर्यादांचं पालन करतो ही बाब तिनं स्पष्ट केली. असं करत असताना लघुशंका करणं हा काही स्टंट नव्हता हेसुद्धा तिनं सांगितलं.


मागच्या आठवड्यातच होतं लाईव्ह कॉन्सर्ट
11 नोव्हेंबरला लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान, सोफिया उरिस्ता हिनं व्यासपीठावर एका चाहत्याला बोलवलं त्याचा तिथे झोपण्यास सांगितलं. ज्यानंतर तिनं त्याच्या चेहऱ्यावर लघुशंका केली.


सोफियाच्या या कृतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर कमालीचा व्हायरल झाला. ज्यानंतर तिच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली होती.




सोफियाच्या या कृतीबद्दल तिच्या बँडनंही माफी मागितली.'सोफिया इतकी उत्साही झाली होती, की तिनं जे काही केलं त्याची आम्हालाही अपेक्षा नव्हती. असं काही तुम्हाला पुन्हा आमच्या शोमध्ये दिसणार नाही', अशा शब्दांत बँडनं दिलगिरी व्यक्त केली.