मेरठ : कोरानामुळे चंद्रो तोमर (Chandro Tomar) नावाच्या प्रसिद्ध नेमबाज आजीचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. श्वास घेण्यात त्रास होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. आज म्हणजे शुक्रवारी, मेरठच्या रूग्णालयात त्यांचा मृत्यू झाला आहे. 89 वर्षीय चंद्रो तोमर गेल्या अनेक दिवसांपासून मेरठच्या आनंद हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होत्या. 26 एप्रिल रोजी त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता आणि त्यांनी ही माहिती स्वत: सोशल मीडियावरुन सगळ्यांना दिली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चंद्रो तोमर (Chandro Tomar) यांच्या मृत्यूची बातमी सोशल मीडियावर पसरताच लोकं चकित झाले आहे. त्यांच्या मृत्यूमुळे सोशल मीडियावर #ShooterDadi ट्रेंड करत आहे. युजर्ससह बॉलिवूडचे अनेक स्टार्स ही बातमी शेअर करुन आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.


'सँड की आँख' 2019मध्ये आलेल्या या चित्रपटात दाखवली गेलेली कहाणी ही चंद्रो तोमर आणि प्रकाश तोमर यांच्या जीवनावर आधारीत कहाणी आहे. या चित्रपटात चंद्रोची भूमिका साकारणारी अभिनेत्री भूमी पेडणेकर म्हणते की, चंद्रो तोमर यांचे निधन हे तिच्यासाठी एक 'वैयक्तिक नुकसान' आहे.


भूमी म्हणाली, "चंद्र्रो दादी आता आपल्यात राहिली नाही हे जाणून फार वाईट वाटले. हे माझे वैयक्तिक नुकसान आहे. ती स्वतःचे नियम बनवायची आणि ती तिचा स्वतःचा मार्ग निवडत असंत. प्रकाश दादीबरोबर ही त्यांचे एक सुंदर नाते होते आणि या दोघींचा प्रभाव अनेकांच्या जीवनावर झाला आहे."


भूमीने पुढे म्हणाली की, "दादीची भूमिका साकारण्यासाठी मला मिळाली त्याबद्दंल मी स्वत:ला खूप भाग्यवान समजते. मला तिच्या आयुष्याबद्दल जाणून घेण्याची संधी मिळाली. मी तिली नेहमी लक्षात ठेवेन."