नवी दिल्ली : डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राहीलेला राम रहीम याच्यावर लवकरच सिनेमा येत असून या सिनेमाचं शूटींगही सुरु झालं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बलात्कार प्रकरणात दोषी असलेल्या राम रहीमला २० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मात्र, त्याची मानलेली मुलगी हनीप्रीत फरार झाली असून पोलीस तिच्या शोधात आहेत. आता याच राम रहीमवर सिनेमा बनविण्यात येत आहे आणि यामध्ये अभिनेत्री राखी सावंत ही हनीप्रीतच्या भूमिकेत असणार आहे.


Image Courtesy: India.com

या सिनेमात राम रहीमने केलेल्या गैरकृत्यांना दाखविण्यात येणार आहे. रॉकस्टार बनण्यापासून राम रहीम जेलमध्ये जाण्यापर्यंतची स्टोरी या सिनेमात दाखविण्यात येणार आहे. तसेच त्याचे हनीप्रीतसोबतचे असलेले नातेही सिनेमात दाखविण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे. झी रिजनल चॅनल्सचे सीईओ जगदीश चंद्र यांना दिलेल्या एका एक्सक्लूझिव्ह मुलाखतीत राखीने म्हटलं की, साडे तीन वर्षांपूर्वी राम रहीम आणि हनीप्रीतसोबत ओळख झाली होती.


Image Courtesy: India.com

राम रहीमसोबत अनेक भेटीही झाल्या, त्याने राजकारणात प्रवेश करण्याचा सल्लाही दिला होता. राम रहीम मला सिरसा येथे घेऊन गेला. बाबाने मला त्याच्या जन्मदिवशी डेऱ्यात बोलावलं होतं. तेथे बाबा आणि माझ्यातील जवळीक पाहून हनीप्रीत घाबरली होती असेही राखीने म्हटलं.


Image Courtesy: India.com

राखीने सांगितले की, बाबावर आधारीत सिनेमाचं शूटींग दिल्लीत सुरु आहे. मला काही दिवसांपूर्वी हनीप्रीतच्या नावाने फोन आला आणि मला प्रश्न विचारला की, तु माझी मैत्रिण आहेस मग, सिनेमा का बनवत आहेस. बाबावर बनत असेलल्या या सिनेमाचं शूटिंग डिसेंबर-जानेवारीपर्यंत पूर्ण होईल.


Image Courtesy: India.com

या सिनेमासाठी फायनान्सरची वाट पाहत आहोत. सिनेमाचं शूटींग दिल्लीत होत असून एका सीनमध्ये बाबा राम रहीम हा हनीप्रीतचं स्वप्न पाहत आहे असेही राखीने सांगितले.