मुंबई : सध्या छोट्या - छोट्या अनेक शॉर्टफिल्म्स यूट्युबवर धुमाकूळ घालत आहेत... 'द स्कूल बॅग' ही अशीच एक शॉर्टफिल्म...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१६ डिसेंबर २०१४ रोजी पाकिस्तानच्या पेशावरमध्ये दहशतवाद्यांनी एका शाळेला टार्गेट केलं. आर्मी पब्लिक स्कूलमध्ये केलेल्या बेछूट गोळीबारात तब्बल १३२ चिमुरड्यांनी आपला जीव गमावला होता. याच पार्श्वभूमीवर 'द स्कूल बॅग'चं कथानक आधारलेलं आहे.


या शॉर्ट फिल्ममध्ये रसिका दुग्गल आणि सरताज कक्कड यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सरताज याआधी 'जुडवा २'मध्ये लहानग्या वरुणच्या भूमिकेत दिसलाय तर त्याचा 'टायगर जिंदा है' लवकरच मोठ्या पडद्यावर दाखल होणार आहे.


उल्लेखनीय म्हणजे, लेखक अंशुल अग्रवाल आणि दिग्दर्शक धीरज जिंदल यांनी या शॉर्ट फिल्मच्या चित्रणासाठी पाकिस्तानचं बुलंदशहर गाठलंय.


ही शॉर्ट फिल्म पाकिस्तानसहीत २६ देशांतील फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखवण्यात आलीय. तब्बल २७ अवॉर्ड या शॉर्ट फिल्मला मिळालेत.