मुंबई : टीव्ही अभिनेत्री श्रद्धा आर्या (Shraddha Arya)आनंदी आयुष्य जगत आहे. श्रद्धाने नोव्हेंबर 2021 साली बॉयफ्रेंड राहुल नाहलसोबत लग्न केलं. श्रद्धाचा पती नौदल अधिकारी आहे. लग्नानंतर श्रद्धा कायम पतीसोबत फोटो शेअर करत चाहत्यांना कपलगोल्स देत असते.  एवढंच नाही तर, अभिनेत्रीने पतीसोबत नव्या घरी शिफ्ट होण्याचा निर्णय देखील घेतला. दोघांनी नवीन घर देखील विकत घेतलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण त्या घराचं इंटेरिअरचं काम अद्याप पूर्ण झालेलं नाही. नव्या घराचं इंटेरिअर करण्यासाठी श्रद्धाने ऑनलाईन एका इंटेरिअर डिझायनरची निवड केली. पण त्या इंटिरियर डिझायनरने श्रद्धाची फसवणूक केली. 



या घटनेची माहिती श्रद्धाने एका मुलाखतीत दिली आहे. 'मी ऑनलाइन इंटीरियर डिझायनर शोधत होती, तेव्हा मला एक इंटिरियर डिझायनर सापडला. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये माझ्या लग्नानंतर मी त्याला माझ्या घराचं इंटेरिअर करण्याचं काम दिलं. 


ती पुढे म्हणाली, 'चार महिन्यांत काम पूर्ण करण्याचे आश्वासन त्या व्यक्तीने मला दिले. मात्र त्यासाठी जास्त वेळ लागला. यासाठी त्याने माझ्याकडे लाखो रुपयांची मागणी केली होती. त्यातील 95 टक्के रक्कम मी त्याला आधीच दिली. 



पण श्रद्धाने ज्या इंटेरिअर डिझायनरची निवड केली तो व्यक्ती अभिनेत्रीचे पैसे आणि घरासाठी खरेदी केलेल्या सर्व वस्तू घेऊन पळून गेला असल्याचं देखील अभिनेत्रीने सांगितलं आहे. 


त्यामुळे तुम्ही देखील जर ऑनलाईन इंटेरिअर डिझानरची  निवड केली असेल, तर सर्वात आधी त्या व्यक्तीची माहिती घ्या. त्यानंतर पुढील व्यवहार करा.