Shraddha Arya Pregnant : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक 'कुंडली भाग्य' (Kundali Bhagya) आहे. या मालिकेत श्रद्धा आर्या (Shraddha Arya) दिसली आहे. श्रद्धा आर्यानं आजवर दाक्षिणात्य चित्रपटांपासून अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. श्रद्धा ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सध्या श्रद्धाचा एक फोटो व्हायरल झाला असून त्यात ती बेबी बंप फ्लॉंट करताना दिसत आहे. आर्या ही सोशल मीडियावर सक्रिय आहे. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपूर्वी श्रद्धानं खुलासा केला की ती स्क्रिनवर 10 वेळा नवरी झाली आहे. श्रद्धानं याविषयी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत सांगितले होते. दरम्यान, आता श्रद्धानं तिच्या प्रेग्नंसीचा खुलासा केला आहे. श्रद्धानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून बेबी बंपचा फोटो शेअर केला आहे. तिची ही पोस्ट पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला खूप शुभेच्छा दिल्या आहेत. फोटोत श्रद्धा शक्ति अरोरासोबत दिसत आहे. तिचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 


फोटो समोर -



आता सगळ्यांना प्रश्न पडला असेल की काही दिवसांपूर्वीच तर श्रद्धाचं फ्लॅट पोट आपण पाहिलं आणि ते इतक्यात मोठं कसं झालं. तर श्रद्धा आर्या ही खऱ्या आयुष्यात प्रेग्नंट नाही ती मालिकेतील भूमिकेत प्रेग्नंट आहे. मालिकेती BTS (Behind The Scene) चा हा फोटो शेअर केला आहे. श्रद्धा आर्या कुंडली भाग्य या मालिकेतील प्रीता ही भूमिका साकारते.  दरम्यान, श्रद्धा आणि शक्तीच्या या फोटोवर नेटकरी कमेंट करत त्यांना एकत्र पाहून आनंद झाल्याचे म्हटले आहे. 


हेही वाचा : 'बाईच बाईची...', Gautami Patil च्या व्हायरल न्यूड व्हिडीओचे सोशल मीडियावर पडसाद


श्रद्धा आर्यानं नेवी ऑफिसर राहुल नागलशी गेल्यावर्षी लग्न केलं आहे. सगळ्यात आधी राहूल आणि श्रद्धाचं लग्न मोडलं होतं. इतकंच काय तर या आधी श्रद्धाचा साखरपुडा देखील झाला होता. 2015 मध्ये अभिनेत्रीनं एनआरआय बिझनेसमॅन जयंत रत्तीसोबत लग्न ठरले होते. मात्र, त्यांचा साखरपुडा मोडला होता. त्याचं लग्न मोडण्याचे कारण म्हणजे जयंतनं श्रद्धासमोर एक अट ठेवली होती आणि ती म्हणजे लग्नानंतर तिला अभिनय सोडावा लागेल.