मुंबई : बॉलिवूड स्टार्स अनेकदा त्यांच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर फोटो शेअर करतात. याशिवाय, जेव्हाही या स्टार्सची भेट चाहत्यांसोबत होते, तेव्हा बऱ्याचदा चाहते सेल्फीचा आग्रह धरतात. अशावेळी कलाकार देखील फॅन्सच्या प्रेमाचे आभार मानत चाहत्यांसोबत फोटो काढतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अलीकडेच, अभिनेत्री श्रद्धा कपूरला देखील एअरपोर्टवर तिची एक जबरा चाहती भेटली. श्रद्धाला एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आलं. यावेळी फोटोग्राफर श्रद्धाचे फोटो काढत असताना एक फॅन गर्लसोबत तिची टक्कर झाली. श्रद्धाला तिच्या डोळ्यांसमोर पाहून ही मुलगी खूपच भावूक झाली. यानंतर काय झाले हे पाहून प्रत्येकजण श्रद्धाची स्तुती करत होते.


श्रद्धा कपूरचा हा विमानतळाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये श्रद्धाचा एक चाहती भेटते आणि आपल्या ड्रीम स्टारला पाहून ती भावूक होते. यानंतर श्रद्धाने आपल्या फॅनला असं रडताना पाहून तिला शांत करण्याचा प्रयत्न केला आणि तिच्यासोबत थोडा वेळ घालवला.



चाहतीच्या वागण्यातून याचा अंदाज लावला जाऊ शकतो की, ती श्रद्धाला पाहून किती उत्साहित झाली होती आणि यामुळे तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू आले. श्रद्धानेही हा फॅन मुव्हमेंट चांगल्या प्रकारे हाताळला आणि फॅनसोबत सेल्फी काढला.