मुंबई : गान कोकिळा लता मंगेशकर आता आपल्यात नाहीत. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. अशा परिस्थितीत त्यांची आठवण करून त्यांचे चाहते त्याच्याशी संबंधित जुन्या आठवणी सोशल मीडियावर शेअर करत आहेत.  या बातमीने सर्वांनाच हादरवून सोडलं आहे. त्याचबरोबर लताजींच्या निधनाच्या बातमीमुळे मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लताजींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तेव्हा त्यांची धाकटी बहीण आणि ज्येष्ठ गायिका आशा भोसले, भाऊ आणि श्रद्धा कपूर त्यांची प्रकृती जाणून घेण्यासाठी ब्रीच कँडी रुग्णालयात पोहोचले होते. त्याचबरोबर आज सकाळीही श्रद्धा हॉस्पिटलमध्ये पोहोचली होती. श्रद्धा कपूर आणि लता मंगेशकर यांच्यात असं काय खास नातं आहे की, ती प्रत्येक क्षणी त्यांच्यासोबत उभी असल्याचं पाहायला मिळालं. 


फार कमी लोकांना माहिती आहे की, श्रद्धा कपूर आणि लता मंगेशकर यांच्यात खूप घट्ट नातं आहे.  श्रद्धा कपूरचे आजोबा लता मंगेशकर चुलत बहिणी होत्या. म्हणजेच श्रद्धाची आई शिवांगी कपूर लता मंगेशकर यांची भाची आहे.  त्यामुळे श्रद्धा ही लता मंगेशकर यांची नात्याने नात लागते.


श्रद्धा कपूरचे आजोबा पंढरीनाथ कोल्हापुरे यांच्या सावत्र बहिणीची आई आणि दीनानाथ मंगेशकर यांचं संपूर्ण मंगेशकर कुटुंबाशी नातं होतं. दीनानाथ मंगेशकर, लता मंगेशकर, आशा भोसले, मीना, उषा आणि हृदयनाथ मंगेशकर यांच्या काकूंच्या त्या सावत्र बहीण आहेत. कदाचित यामुळेच लता मंगेशकर यांची नात असल्याने श्रद्धालाही गाण्याची आवड निर्माण झाली. लता मंगेशकर यांच्यासोबत श्रद्धा कपूरला अनेकवेळा स्पॉट केलं आहे. त्याचवेळी त्यांचे फॅमिली फोटोही अनेकदा समोर आले आहेत.