मुंबई : 'आशिकी - २'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या श्रद्धानं आपलं एक स्थान निर्माण केलंय. श्रद्धाचे वडील शक्ती कपूर बॉलिवूडमधले चर्चित 'व्हिलन'... पण, फार कमी जणांना श्रद्धाच्या आईबद्दल माहिती असेल... श्रद्धाच्या आईचं नावं आहे शिवांगी कोल्हापूरे... शिवांगी ही बॉलिवूड अभिनेत्री पद्मिणी कोल्हापूरे यांची बहिण...


अभिनेत्री आणि पार्श्वगायिका


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवांगी यांनीही एकेकाळी मोठ्या पडद्यावर काम केलंय, हे ऐकलं तर आश्चर्य वाटायला नको... पण, शिवांगीनं आपल्या बॉलिवूड करिअरला सुरुवात मात्र एक पार्श्वगायिका म्हणून केली होती, हे विशेष... शिवांगीनं यादों की बारात, बाजी, जादू टोना, साजन बिना शगुन आणि बारुद यांसारख्या सिनेमांत आपला आवाज दिलाय.


शक्ती-शिवांगी-श्रद्धा

 शक्तीसोबत विवाह...


शिवांगीच्या दोन बहिणी... पद्मिनी आणि तेजस्वी... शिवांगी आणि शक्ती कपूर यांचा प्रेमविवाह... अगदी 'बॉलिवूड'स्टाईल... १९८० मध्ये शिवांगीनं 'किस्मत' या सिनेमात अभिनेत्री म्हणून काम केलं... या सिनेमात तिच्यासोबत मिथुन चक्रवर्ती आणि शक्ती कपूरदेखील होते. याच सिनेमाच्या निमित्तानं शक्ती आणि शिवांगी पहिल्यांदा एकमेकांना भेटले... आणि एकमेकांच्या प्रेमातही पडले. दोघांनी लगेचच विवाह करण्याचाही निर्णय घेऊन टाकला. 


या प्रेमाला शिवांगीच्या कुटुंबीयांनी विरोध केला. त्यामुळे शक्ती-शिवांगीनं घरच्यांचा विरोध पत्करून घरातून पळून जाऊन विवाह केला. १९८२ साली हे जोडपं विवाहबंधनात अडकलं. यावेळी शिवांगी केवळ १८ वर्षांची होती.


बॉलिवूडपासून फारकत


विवाहानंतर मात्र शिवांगीनं बॉलिवूडपासून दूर राहणंच पसंत केलं. मुलगी श्रद्धा आणि मुलगा सिद्धांत यांनाच तिनं आपली प्राथमिकता दिली. सिद्धांत कपूर अग्ली, जज्बा, हसीना पार्कर या सिनेमांत दिसलाय.


शिवांगी अनेकदा मुलगी श्रद्धासोबत अनेक कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसते. श्रद्धानंही शिवांगीकडूनच अभिनय आणि संगीताचे प्राथमिक धडे घेतलेत, म्हटलं तर वावगं ठरायला नको.