Shraddha Kapoorच्या घरात अचानक घुसला नवा मित्र, पाहा VIDEO नक्की काय घडलं श्रद्धा कपूरसोबत...
व्हि़डिओ शेअर करताच सोशल मीडियावर श्रद्धाचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे
मुंबई : बॉलिवूडची चुलबुली आणि ग्लॅमरस अभिनेत्री श्रद्धा कपूर आजकाल तिच्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यात खूप व्यस्त आहे. अलीकडेच तिचा आगामी 'चलबाज इन लंडन' या सिनेमाची घोषणा झाली आहे. पण या सिनेमाशिवाय श्रद्धा कपूर तिच्या इन्स्टाग्राम व्हिडिओमुळे चर्चेत आहे. या व्हिडिओमध्ये ती गोरिलासोबत धमाल मस्ती करताना दिसत आहे.
अभिनेत्री श्रद्धा कपूर सोशल मीडियावर कायम अॅक्टिव असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धा कायम तिच्या चाहत्यांच्या संपर्कात असते. सोशल मीडियावरुन श्रद्धा स्वत:चे व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असते. नुकताच श्रद्धाने एक व्हिडिओ सोशल मीडियावरुन शेअर केला आहे.
हा व्हिडिओ पाहून श्रद्धाचे चाहते स्तब्ध झाले आहेत. हा व्हिडिओ शेअर करताच सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओत श्रद्धासोबत एक गोरिला देखील दिसतो आहे. ज्यामुळे श्रद्धा कपूर घाबरण्याऐवजी त्याच्याबरोबर मजा करत आणि डान्स करताना दिसत आहे.
पहा हा व्हिडिओ
लवकरच अॅमेझॉन प्राइमवर 'हॅलो चार्ली' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. श्रद्धाने शेअर केलेला हा व्हिडिओ 'हॅलो चार्ली' या सिनेमाच्या प्रमोशन दरम्यानचा आहे. या चित्रपटात गोरिल्ला टोटो आणि चार्ली यांची धमाल पाहायला मिळणार आहे.
'हॅलो चार्ली' सिनेमामध्ये दिसणार श्रद्धा कपूर
श्रद्धा कपूर लवकरच 'चलबज इन लंडन'मध्ये डबल रोल करताना दिसणार आहे. श्रद्धा ही पहिल्यांदा डबलरोल साकारणार आहे. श्रद्धाच्या नवीन प्रोजेक्टच्या घोषणेनंतर तिचे चाहते बरेच उत्सुक असल्याचं पहायला मिळत आहे. याशिवाय ती निखिल द्विवेदीच्या 'नागीन' चित्रपटात एका इच्छाधारी सर्पाच्या भूमिकेतही दिसणार आहे.