Stree 2 Box Office Day 8: श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्या 'स्त्री 2' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. 15 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत देखील अनेक चित्रपटांना मागे टाकले आहे. प्रत्येकजण श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्या 'स्त्री 2' चित्रपटाबद्दल बोलताना दिसत आहे. अक्षय कुमारचा 'खेल खेल में' आणि जॉन अब्राहमचा 'वेदा' या चित्रपटाने मोठ्या प्रमाणात कमाई केली नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉक्स ऑफिसवर 'स्त्री 2' चित्रपटाने अनेक मोठ्या चित्रपटांना मागे टाकले आहे. 'स्त्री 2'ने कमाईच्या बाबतीत शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खानच्या अनेक मोठ्या चित्रपटांना कमाईच्या बाबतीत मागे टाकले आहे. पण आता श्रद्धा कपूरच्या या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत केलेला पराक्रम हा पाहण्यासारखा आहे. 


'स्त्री 2'ने गाठला 400 कोटींचा आकडा


जर आपण 'स्त्री 2' च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर नजर टाकली तर आत्तापर्यंत या चित्रपटाने भारतात 290.85 कोटी रुपयांची कमाई केली आहे. 'स्त्री 2' हा चित्रपट 60 कोटींच्या बजेटमध्ये बनवला आहे. मात्र, या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत जगभरात आपला ठसा उमटवला आहे. मीडिया रिपोर्टनुसार 'स्त्री 2' ने जगभरात 400 कोटींचा आकडा पार केला आहे. 


'स्त्री 2' ने मोडला 'गदर 2' चा हा विक्रम


श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांचा 'स्त्री 2' हा चित्रपट 15 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला. मैडॉक फिल्म्स आणि जिओ स्टुडिओजच्या हॉरर-कॉमेडी 'स्त्री 2' या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात 8 दिवस बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली आहे. कमी बजेट असणाऱ्या 'स्त्री 2' चित्रपटाने भारतातील मोठ्या ब्लॉकबस्टरच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. 'स्त्री 2' चित्रपटाने दुसऱ्या गुरुवारी 16 कोटी रुपयांच्या कमाईसह 'स्त्री 2' हा आतापर्यंतचा चौथा हिंदी चित्रपट ठरला आहे. ज्याने कमाईच्या बाबतीत सर्वात मोठा आठवडा गाठला आहे. 


या यादीमध्ये अभिनेता शाहरुख खानच्या दोन चित्रपटांची नावे पहिल्या क्रमांकावर आहेत. पहिल्या क्रमांकावर 'पठाण' तर दुसऱ्या क्रमांकावर 'जवान' आणि तिसऱ्या क्रमांकावर रणबीर कपूरचा 'अॅनिमल' हा चित्रपट आहे. सनी देओलच्या 'गदर 2' हा चौथ्या क्रमांकावर होता. पण आता 'स्त्री 2' ने आता 'गदर 2' ची जागा घेतली आहे. त्यामुळे 'गदर 2' पाचव्या क्रमांकावर गेला आहे. या आठवड्यात श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांचा 'स्त्री 2' हा चित्रपट 500 कोटींच्या क्लबमध्ये सामील होण्याची शक्यता आहे.