Shreya Bugde Mridagandh Award 2022 : 'काही काही क्षण मी कलाकार आणि माणूस म्हणून खूप नशीबवान असल्याची जाणीव करून देतात ...' अभिनेत्री श्रेया बुगडेने (Shreya Bugde) इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत जीवनातील कधीही न विसरता येणारी आठवण चाहत्यांसोबत शेअर केली आहे.  श्रेयाने काही फोटो शेअर करत कॅप्शनच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या. आता तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल श्रेयाच्या आयुष्यातील ही 'गुडन्यूज' नक्की आहे तरी काय? श्रेयाची गुडन्यूज ऐकून अभिनेत्रीच्या चाहत्यांना देखील नक्कीच आनंद होईल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकशाहीर विठ्ठल उमप फाऊंडेशनतर्फे देण्यात येणार 2022 सालचा 'मृदगंध पुरस्कार' श्रेयाला देण्यात आला आहे. पुरस्काराने  सन्मानीत करण्यात आल्यानंतर श्रेयाने इन्स्टाग्राच्या माध्यमातून चाहत्यांसोबत आनंद शेअर केला. 



अभिनेत्री कॅप्शनमध्ये म्हणाली, 'काही काही क्षण मी कलाकार आणि माणूस म्हणून खूप नशीबवान असल्याची जाणीव करून देतात ...हा त्यापैकीं एक ....ह्या वर्षीचा १२ वा लोकशाहीर विठ्ठल उमप फाऊंडेशन चा 'मृदगंध'पुरस्कार' 2022'-नवोन्मेष प्रतिभा ' हा पुरस्कार मिळाला .. लोकशाहीर विठ्ठल उमप यांसारख्या थोर कलाकाराच्या नावाने असलेल्या पुरस्काराबरोबर माझं नाव जोडलं गेलं , ज्याचा आनंद शब्दात मांडता येणार नाही !' (shreya bugde net worth)
 
'व्यासपीठावर जे माझे सह पुरस्कर्ते होते त्यांच्या बरोबर उभं सुद्धा राहण्यास मी स्वतःला पात्र समजत नाही .. पण नंदेश दादा सरिता वाहिनी तुमचे खूप आभार इतकं प्रेम आणि सन्मान दिल्याबद्दल.. हा पुरस्कार मा .श्री सुधीर मुनगंटीवार. वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री, महाराष्ट्र राज्य व भारतीय जनता पार्टी चे नेते मा . श्री आशिष शेलार ह्यांच्या हस्ते देण्यात आला.' (shreya bugde cast)


पुरस्कार सोहळ्याचे फोटो शेअर करत श्रेयाने सर्वांचे आभार देखील मानले. 'ह्या सगळ्याचं श्रेय फक्त आणि फक्त तुम्हा रसिक मायबाप प्रेक्षकांचे आहे... लोभ आहेच,तो वृद्धिगंत व्हावा' असं देखील लिहिलं आहे.  (shreya bugde daughter name)


वाचा : पाठकबाई आणि राणादाच्या लग्नाच्या विधी सुरु, Photo Viral


श्रेया बुगडेने आतापर्यंत आपल्या विनोदबुद्धीने प्रेक्षकांना हासण्यास भाग पाडलं. 'चला हवा येवू द्या...' मधून एक विनोदी श्रेया चाहत्यांच्या भेटीस आली. प्रत्येत पात्र आपल्या विनोदाने वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांसमोर मांडणाऱ्या श्रेयाने चाहत्यांच्या मनात घर केलं आहे.