Shreya Bugde Viral Video : 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) फेम अभिनेत्री श्रेया बुगडेनं (Shreya Bugde) अभिनयाच्या जोरावर सगळ्यांची मने जिंकली आहेत. श्रेया ही गेल्या अनेक वर्षांपासून चला हवा येऊ द्या या मालिकेतून प्रेक्षकांना खिळवून ठेवत आहे. तिला मराठीतली कॉमेडी क्वीन म्हणूनही लोक ओळखतात. श्रेया ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर श्रेयानं नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये श्रेयानं चला हवा येऊ द्याच्या सेटवरची एक क्लिप शेअर केली आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रेयानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत श्रेया सगळ्यात आधी एका बॉक्समध्ये बसते आणि त्यानंतर जादूगर त्या बॉक्समध्ये एक ब्लेड आणि काही ब्लॉक्स टाकतो. शेवटी तो बॉक्स हलवून दाखवतो. तर श्रेया ही जागेवरच नसते. याचाच अर्थ श्रेया गायब झालेली असते. या व्हिडीओत श्रेयानं पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. श्रेयाच्या व्हिडीओपेक्षा तिनं दिलेलं कॅप्शन सगळ्यांना आवडलं आहे. श्रेयानं कॅप्शन दिलं की माझ्या नवऱ्याला ही जादु खूप आवडलीये. त्यासोबत तिनं हसण्याचं इमोजी देखील वापरले आहेत. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


श्रेयाच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी देखील कमेंट केल्या आहे. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, नशिब गायब करण्याची जादु नाही केली. तर अनेकांनी अनेकांनी श्रेयाच्या या व्हिडीओवर कमेंट करत हसण्याची इमोजी केले आहे. श्रेया सतत प्रेक्षकांचे मनोरंजन करतान दिसते. श्रेया सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. श्रेयाचे लाखो चाहते आहेत. तर इन्स्टाग्रामवर तिचे 936K तिचे फॉलोवर्स आहेत. 


हेही वाचा : Chrisann Pereira Arrested : 'सडक 2' आणि 'बाटला हाऊस' फेम अभिनेत्रीला अंमली पदार्थांच्या तस्करीत दुबईत अटक!


श्रेयाच्या पतीचे नाव निखील सेठ असे आहे. 27 डिसेंबर 2015 रोजी श्रेया आणि निखील सेठ यांचा विवाह संपन्न झाला होता. श्रेया आणि निखील यांचे लव्ह मॅरेज आहे. श्रेया आणि निखिलची भेट ही एका मालिकेच्या शुटिंग दरम्यान या दोघांची भेट झाली. या मालिकेच्या सेटवर निखील श्रेयाशी मैत्री करण्याचा प्रयत्न करत असे. मात्र, त्यांच्यात कोणत्यातरी गोष्टीवरून बिनसलं आणि ते दोघं लांब झाले. त्यांच्यातला हा दुरावा फार काळ राहिला नाही. कारण एका गाजलेल्या मराठी मालिकेचा कार्यकारी निर्माता अशी निखीलच्या नावाची क्रेडिट लाईन श्रेयाने पाहिली आणि त्याला शुभेच्छा देण्यासाठी फोन केला. त्यानंतर त्यांच्यातील दुरावा संपला आणि अखेर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.