Shreyas Talpade : ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मराठी मालिकांपैकी एक आहे. या मालिकेतील कलाकारांनी प्रेक्षकांची मने जिंकली. त्यातील सगळ्यात लोकप्रिय ठरलेली कोणी असेल तर सगळ्यांची लाडकी परी म्हणजेच मायरा तर आजही प्रेक्षकांच्या मनात बसली आहे. ती मालिका संपली तेव्हा सगळ्यांना मोठं आश्चर्य झालं. इतकंच नाही तर ही मालिका कधी संपावी अशी त्यांची इच्छा नव्हती. दरम्यान, मालिका संपल्यानंतर अनेक चाहत्यांनी ही मालिका परत कधी पाहायला मिळेल अशी इच्छा व्यक्त करत होते. दरम्यान, आता या मालिकेत यश ही भूमिका साकारणारा मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेनं मालिकेच्या दुसऱ्या भागाची हिंट दिली आहे अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रेयसनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत श्रेयस आणि माझी तुझी रेशीमगाठ मालिकेचे दिग्दर्शक अजय मयेकर एकत्र दिसत आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला श्रेयस बोलतो "आम्हाला दोघांनाही मनापासून असं वाटतं होतं की आपण भेटावं. पण वेळ मिळत नव्हती. त्यामुळे शक्य होत नव्हतं. पण मनात दोघांच्या इतकं प्रेम होतं. माझी तुझी रेशीमगाठचे जितके चाहते आहेत, त्या सर्वांना आज हे पाहून प्रचंड आनंद होणार आहे. पण आज काहीही प्लॅन न करता दोघांचेही शूटींग एकाच ठिकाणी होते. आम्ही एकमेकांच्या समोरासमोर आलो, पाऊस पडत होता आणि त्या पावसात आमची रेशीमगाठ पुन्हा एकदा जोडून आली." 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


त्यानंतर श्रेयस जवळ जाताच अजय मयेकर बोलतात “सर मला जाऊ द्या, माझं शूटींग सुरु आहे”, असं बोलतात. त्यावर श्रेयस “जोपर्यंत तू ‘माझी तुझी रेशीमगाठ’चा दुसरा सीझन कधी येणार हे सांगत नाही तोपर्यंत मी तुला जाऊ देणार नाही”, सांगतो. त्यावर उत्तर देत अजय मयेकर बोलतात, “सर तुमच्या तारखा नाहीत, मॅडमच्या तारखा नाहीत”.हा व्हिडीओ शेअर करत श्रेयसनं वो घडी जिसका आप सभी को इंतजार था …. आमची ही रेशीमगाठ कधीही तूटायची नाही!” असं श्रेयसनं कॅप्शन दिलं. त्यामुळे ते दोघे मिळून पुन्हा रेशीमगाठच्या दुसऱ्या सीझनबद्दल बोलत असल्याचा अंदाज प्रेक्षकांनी बांधला आहे. याशिवाय या व्हिडीओवर अभिनेत्री प्रार्थना बेहरे आणि स्वाती देवल यांनी त्यावर कमेंटही केल्या आहेत. त्यांच्या या कमेंट पाहता नेटकऱ्यांना आशा लागली आहे की लवकरच त्यांना ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिका पाहायला मिळेल. 


हेही वाचा : 'लस्ट स्टोरी 2' फेम 40 वर्षीय अंगद बेदीला 64 वर्षांच्या नीना गुप्ता यांच्यासह करायचा आहे रोमान्स, म्हणतो "त्या ज्या प्रकारे ..."


श्रेयसच्या या व्हिडीओवर कमेंट करत प्रार्थना बोलते की 'माझ्याही तारखा फ्री आहेत. मी तुम्हाला खूप मिस करतेय.' तर स्वाती कमेंट करत म्हणाली, 'हो माझ्याही तारखा आहेत. मी ही फ्री आहे. त्या दिवसांना मिस करतेय.'