मुंबई : काही दिवसांपुर्वी  अभिनेता श्रेयस तळपदेला हृदिय विकाराचा झटका आला होता. यानंतर तातडीने अभिनेत्याला हॉस्पिटमध्ये दाखल करण्यात आलं. सध्या त्याच्या प्रकृतीत सुधारणा असल्यामुळे नुकताच अभिनेत्याला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. श्रेयच्या आरोग्याविषयी त्याची पत्नी दीप्ती तळपदे सतत त्याच्या चाहत्यावर्गाला सोशल मीडियाच्या माध्यमातून अपडेट देत होती. नुकतीच दिप्तीने पोस्ट शेअर करत श्रेयसला डिस्चार्ज मिळाल्याची माहिती त्याच्या चाहत्यांना दिली आहे. दीप्तीने बुधवारी इंस्टाग्रामवर स्वतःचे आणि श्रेयसचे अनेक फोटो पोस्ट केले. याचबरोबर तिने तिचे कुटुंबीय, मित्र आणि चाहत्यांचे आभार मानले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत दिप्तीने म्हटलं आहे की, 'माझं आयुष्य, श्रेयस, घरी सुखरुप परतला आहे... सेफ आणि हेल्दी.. मी माझा विश्वास कुठे ठेवायचा हेम मला नाही माहिती यावर मी श्रेयसशी वाद घालेन. आज मला माझ्या प्रश्नाचे उत्तर कळलं. प्रश्न, देव सर्वशक्तिमान आहे. आमच्या आयुष्यात ही कठीण घटना घडली त्या संध्याकाळी तो माझ्यासोबत होता. मला नाही वाटत की यापुढे मी त्याच्या अस्तित्वावर कधी प्रश्नचिन्ह उभे करेन.


 दीप्तीने पुढे लिहिले की, 'मी एक क्षणभर थांबते आणि आपल्या शहरातील चांगल्या लोकांचे मी आज आभार मानते. त्या संध्याकाळी मी मदतीसाठी कॉल केला, मदत मागितली आणि त्यापैकी 10 लोकं माझ्या मदतीला धावून आले. श्रेयस गाडीच्या आत पडलेला असताना, ती लोकं कोण आहेत हे त्याला माहीत नव्हतं पण ते मदत करत होते. ते धावत आले. त्या सर्व लोकांसाठी, त्या संध्याकाळी तुम्ही आमच्यासाठी देवाचा अवतार होता. धन्यवाद. मला आशा आहे की माझा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचेल.


'मी मनापासून तुमची कायम आभारी राहीन. हेच या महान शहर मुंबईचा आत्मा आहे. यामुळेच मुंबई बनली आहे.  त्यावेळ प्रेत्येकाने आम्हाला मदत केली कोणीच आमच्याकडे दुर्लक्ष केलं नाही. आमची काळजी घेण्यात आली. दीप्ती म्हणाली, मी माझे मित्र, कुटुंब आणि आमच्या सिने इंडस्ट्रीचे आभार मानू इच्छिते... हिंदी आणि मराठी प्रत्येकाच्या प्रेमासाठी आणि काळजीबद्दल. त्यातील काही जण सर्व काही सोडून माझ्या पाठीशी उभे राहिले. तुमच्या सर्वांमुळेच. मी एकटी नव्हते. माझ्याकडे झुकण्यासाठी खांदे आणि मजबूत राहण्यासाठी प्रचंड आधार होता.


'मी बेले व्ह्यू हॉस्पिटलच्या अद्भुत टीमचे आभार मानू इच्छिते, ज्यांनी त्वरित उपचार करून माझ्या पतीला वाचवलं. सर्व डॉक्टर, बहिणी, भाऊ, मुलं, मावशी, माता, प्रशासन आणि सुरक्षा, तुमच्या कामासाठी कोणतीही रक्कम पुरेशी नाही.



'मी सर्व चाहत्यांचे आभार मानते. श्रेयस लवकरात लवकर बरा व्हावा आणि चांगल्या आरोग्यासाठी माझ्यासोबतच प्रार्थना करणाऱ्या अनेकांना तुमचं प्रेम, प्रार्थना आणि आशीर्वाद मला या कठीण काळात मिळाले. धन्यवाद. त्या संध्याकाळी देवाच्या रुपात तुम्ही सर्वांनी माझी मदत केली जगाच्या कानाकोपऱ्यातून. आणि यासाठी मी खरोखरच नम्र आणि सदैव कृतज्ञ आहे. धन्यवाद.' अशी भावूक पोस्ट दिप्तीने तिच्या सोशल मीडियावर शेअर केली आहे. तिने शेअर केलेल्या पोस्टनंतर चाहते तिच्या या पोस्टवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.