अजय देवगनच्या खोड्यांमुळे श्रेयस तळपदेची उडाली झोप, रोहित शेट्टीने केला खुलासा
बॉलिवूडचा सुपरस्टार अजय देवगन फक्त त्याच्या अभिनयासाठीच प्रसिद्ध नाही, तर त्याच्या मस्तीखोर स्वभावासाठीही ओळखला जातो. सेटवर त्याच्या खोड्यांचे अनेक किस्से आहेत. अलीकडेच अभिनेता श्रेयस तळपडेने त्याच्याशी संबंधित एक मजेदार प्रसंग शेअर केला, ज्यामध्ये अजय देवगनने `गोलमाल अगेन` च्या सेटवर त्याची चक्क झोपमोड केली.
श्रेयस तळपदे हा सध्या 'पुष्पा 2' चित्रपटामुळे खूपचं चर्चेत आहे. श्रेयसने 'पुष्पा 2' चित्रपटासाठी व्हॉइसऑवर दिलेला आणि या चित्रपटाने जगभरात तब्बल 1800 कोटींची कमाई केली. श्रेयस तळपदेने नुकत्याचं एका पॉडकास्टमध्ये बोलताना म्हणाला, 'अजय देवगण जर तुमच्या आजूबाजूला असेल तर तुम्हाला सावध राहण्याची आवश्यकता आहे, खासकरून जर फटाके जवळ असतील. एकदा अजयने सुतळी बॉम्ब तयार करून माझी झोप उडवली होती.' त्याने पुढे सांगितले, 'मी 'गोलमाल अगेन'च्या पोस्टर शूटिंगच्या वेळी खूप थकलो होतो. परिणीती चोप्राशी बोलत असताना मला अचानक झोप येऊ लागली. त्याचवेळी अजय मागे उभा होता आणि त्याने सुतळी बॉम्ब तयार करून माझ्या मागे ठेवला. फटाका फुटला आणि मी एकदम भांबावलो.' श्रेयसच्या या किस्स्यामुळे अजय देवगणच्या सेटवरील खोड्यांचा एक वेगळाचं चेहरा समोर आला.
अजय देवगणच्या खोड्यांमुळे घटस्फोटाचाही झाला खुलासा
अजय देवगणच्या खोड्यांमुळे अनेक मजेदार प्रसंग घडले आहेत, पण यातील एक खूपच चर्चेत आलेला किस्सा म्हणजे दिग्दर्शक रोहित शेट्टीने केलेला प्रॅंक. रोहितने शेट्टीने सांगितले की, 'आम्ही एका प्रॅंक्समध्ये एका प्रोडक्शन टीममधील व्यक्तीच्या घरी एक स्त्री आणि मुलगा पाठवला होता आणि ती त्याची पहिली पत्नी असल्याचा दावा करत होती. हे प्रॅंक इतका गंभीर झाला की त्या कारणाने त्याला घटस्फोटही घ्यावा लागला.' अजय देवगणने देखील यावर भाष्य करत, 'आमच्या खोड्यांमुळे एक-दोन भांडणं होणे सहाजिक आहे, परंतु त्या वेळी आम्हाला त्याच्या परिणामाचा अंदाज नव्हता. खोड्यांमुळे काही लोकांना वाईट वाटू शकते, परंतु तेव्हा आम्ही त्याचा विचार केला नाही.'
गोलमाल अगेन आणि रोहित शेट्टीचे योगदान
श्रेयस तळपदेने 'गोलमाल अगेन' चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान रोहित शेट्टीच्या दिग्दर्शनाबद्दल उल्लेख केला. त्याने सांगितले की, 'चित्रपटाच्या सुरुवातीला मला माझ्या व्यक्तिरेखेबद्दल अडचण आली. मी 'गोलमाल 3' च्या तुलनेत जास्त ऊर्जा दाखवण्यासाठी संघर्ष करत होतो. पण रोहित शेट्टीने 'गोलमाल 3' च्या काही दृश्यांचे कौतुक करून आम्हाला सर्वांना आठवण करून दिली की आपल्याला तीच ऊर्जा यावेळीही दाखवायला हवी.' यामुळेच 'गोलमाल अगेन' आणि 'गोलमाल 3' या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांचं प्रेम मिळालं आणि ते दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले.
रोहित शेट्टीने एक उत्तम दिग्दर्शक म्हणून सेटवरील कलाकारांची ऊर्जा वाढवली आणि त्यांना योग्य दिशा दिली. त्याच्या या दिग्दर्शनाने चित्रपटाच्या कथा, पात्रे आणि त्याचे सहकारी एकत्र येऊन 'गोलमाल अगेन'ला हिट बनवले. यामुळेच बॉलिवूडमधील या फ्रेंचायझींची लोकप्रियता आजही कायम आहे.
हे ही वाचा: https://zeenews.india.com/marathi/entertainment/after-14-years-in-zindagi-na-milegi-dobara-hrithik-abhay-and-farhan-will-not-be-the-lead-actors-but-siddhant-ishaan-and-vedang-will-be-part-of-the-sequel/874741
अजय देवगण: अभिनयापेक्षा खोड्यांमधून अधिक प्रसिद्ध
अजय देवगणच्या अभिनयाची चांगलीच प्रतिष्ठा आहे, पण तो सेटवरील खोड्यांमुळेही चर्चेत राहतो. त्याची मस्ती आणि त्याचे प्रॅंक्स त्याच्या सहकलाकारांना सतत हसवतात. अजय देवगणने साकारलेल्या भूमिका अत्यंत गंभीर असतात, परंतु त्याच्या खोड्यांच्या वेळेस तो एकदम वेगळाच दिसतो. त्याच्या या खोड्यांमुळे बॉलिवूडच्या सेटवर एक खास वातावरण तयार होते आणि त्याचे सहकलाकार त्याला सेटवरील 'प्रॅंकचा राजा' मानतात.
अशा खोड्यांमुळे त्याच्या आणि सहकलाकारांमधील बॉन्ड अधिक मजबूत होतो आणि सेटवरील कामाचा अनुभव सुद्धा अधिक मजेशीर बनतो.