मुंबई : प्रेक्षकांच्या नजरा खिळवून ठेवणारी ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’ ही मालिकाआजही सगळ्यांच्या स्मरणात आहे. एक आदर्श एकत्र कुटुंब नेमकं कसं असावं?  हे या मालिकेतून उत्तमरित्या मांडण्यात आलं. या मालिकेतील प्रत्येककलाकारांनी आपल्या अभिनयातून प्रेक्षकांची मनं जिंकली. कुटुंबावरआधारित या मालिकेमध्ये दिलीप प्रभावळकर यांनी गंगाधर टिपरे यांची भूमिका साकारली होती. तर अभिनेता राजन भिसे आणि अभिनेत्री शुभांगी गोखले हे त्यांच्या मुलगा आणि सुनेच्या भूमिकेत दिसले होते. तर विकास कदमने (शिऱ्या) त्यांच्या नातवाची तर, रेश्मा नाईकने(शलाका) नातीचीभूमिका साकारली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकंदरीतच हे कुटुंब आपल्या आसपासचे वाटावे इतके खरे, मनालाभावणारे. आपले विश्व विसरायला लावून आपण अगदी त्यांच्यात सामावूनजातो इतके अप्रतिम कलाकृती. दिलीप प्रभावळकरांच्या अनुदिनी यासंग्रहावर तयार केलेली ही मालिका अजरामर ठरली. लॉकडाऊनमध्ये प्रेक्षकांच्या टेन्शनची मात्रा कमी करण्यासाठी ही मालिका झी मराठीवर पुन्हाएकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 



विनोद हे किती सहज असतात, हे यामालिकेतून समजतं आणि आता त्याच विनोदांनी प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा हसू उमटणार आहे. श्रीयुत गंगाधर टिपरे हि मालिका १५ जून पासूनसंध्याकाळी ७.३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येईल.