मुंबई : बॉलिवूड आणि साऊथ सिनेमात आपल्या अभिनयाच्या जोरावर अभिनेत्री श्रुति हासनची लोकप्रियता सर्वाधिक आहे. श्रुति मल्टीटॅलेंटेड असून तिचं फॅन फॉलोइंग जास्त आहे. तसेच श्रुति साऊथचे सुपरस्टार कमल हासन आणि सारिका यांची मुलगी आहे. श्रुति अनेकदा लाइमलाइटपासून दूर असते. मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांशी संवाद साधत असते. हल्लीच तिने आपल्या खासगी आयुष्याबद्दल सांगितलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यामध्ये तिने आपल्या पालकांच्या खासगी आयुष्यातील चढ-उताराबाबत अतिशय मोकळेपणाने गप्पा मारल्या आहेत. या दोघांच्या नात्याकडे ती कोणत्या दृष्टीकोनातून पाहते हे सांगितलं आहे. श्रुतिने सांगितलं की, तिच्या पालकांच्या घटस्फोटामुळे ती खूप एक्सायटेड होती. 



झूम डिजिटलच्या माध्यमातून संवाद साधताना तिने सांगितलं की, 'मी त्यांच्या या निर्णयामुळे खूपच एक्सायटेड होती. आता ते आपापलं खासगी आयुष्य जगू शकतात. मला आनंद आहे की, ते दोघं वेगळे झाले आहे. कुणाला वेगळं व्हायचं असेल तर मला नाही वाटतं की, त्यांनी जबरदस्ती एकत्र राहावं. ते वेगळे झाल्यानंतरही चांगले पालक म्हणून वागत आहेत. मी माझ्या आई-वडिलांच्या अतिशय जवळ आहे. माझी आई चांगली वागत आहे. ती आजही माझ्या जीवनाचा हिस्सा आहे.'


दोघं वेगळेच चांगले आहेत 


अभिनेत्रीने सांगितलं की,'हे दोघे वेगवेगळेच शांत आहे. दोघं एकमेकांच्यासोबत चांगले नाहीत. दोघं वेगळे होऊन वैयक्तिक आयुष्यात सुखी होत आहेत. जेव्हा ते वेगळे झाले तेव्हा मी मोठी होती. मात्र त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.'