Yashoman Apte Mother Instagram Post : छोट्या पडद्यावरील 'चॉकलेट बॉय' म्हणून यशोमन आपटेला ओळखले जाते. यशोमन आपटेला फुलपाखरु या मालिकेमुळे खऱ्या अर्थाने ओळख मिळाली. या मालिकेत तो ऋता दुर्गुळेसोबत झळकला होता. सध्या तो स्टार प्रवाह वाहिनीवरील शुभविवाह या मालिकेत झळकत आहे. आता यशोमनने त्याच्या आईसाठी एक पोस्ट शेअर केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यशोमन आपटेने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने त्याच्या आईचे काही खास फोटो शेअर केले आहेत. त्याने शेअर केलेले हे फोटो आईच्या 60 व्या वाढदिवसाचे आहेत. या फोटोला त्याने हटके कॅप्शन दिले आहे. 


यशोमन आपटेची पोस्ट


"काही दिवसांपूर्वी माझ्या आईची 'साठी' झाली! Sorry आई! ही post करायला मी उशीर केलाय, एक चांगला दिवस शोधत होतो... पण हे post करायला मातृदिनापेक्षा अजून चांगला दिवस कुठला असू शकतो? आईबद्दल काय लिहू असा विचार केला की काही सुचतंच नाही... काय बोलू आईबद्दल? माझी आई मस्त आहे! सुंदर गोड cute! आणि full timepass! आई असली की घरातली सगळी कामं एकदम सुरळीत सुरू असतात पण जर आई २ दिवस घरात नसेल तर आपल्याला काय काय करावं लागतं हे जाणवलं, की आईचं महत्त्वं कळतं! 


पण आईचं महत्त्वं आयुष्यात एवढंच आहे का? आई आपल्या आयुष्यात नेमका काय role play करते? मी ह्या प्रश्र्नचा, एक अभिनेता म्हणून त्या दृष्टिकोनातून विचार केला...की एक आई तिचा 'role' निभावण्यात कधी चुकुच शकत नाही! तिला त्या 'role' साठी कुठलाही अभ्यास करावा लागत नाही कारण बाळाला जन्म देताच तो आईचा role automatically तिच्यामध्ये जन्म घेतो... आपल्या बाळाला काय हवं नको ते आईला बरोब्बर कळत असतं... आपलं मूल धडपडलं तर त्याला धावत जाऊन जवळ घ्यायची 'spontaneous reaction' किंवा प्रेम व्यक्त केल्यावर गालावर एक गोड पापी द्यायची 'addition' कोणालाही तिला सांगावी लागत नाही... आपण कधी तिच्यावर चिडलो, रागावलो तरीही तेवढ्याच प्रेमाने आणि मायेने आपल्या मुलांना ती जेवायला वाढते...


थोडक्यात काय तर आईचं पात्रं त्या बाईमध्ये इतकं भिनलेलं असतं की जगातला कुठलाही अभिनेता एखादं पात्रं तिच्यापेक्षा सुंदर साकारू शकतंच नाही! मग अश्या आईला oscar पेक्षा मोठं कोणतं award द्यायचं बाबा???? आई मी खूप नशीबवान आहे की तू माझ्या आयुष्यात आहेस... तुला आणि जगातल्या सगळ्या आयांना hats off आणि मनापासून नमस्कार! मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा!", असे यशोमन आपटेने म्हटले आहे.



दरम्यान, यशोमन आपटे हा सध्या ‘शुभविवाह’ या मालिकेत आकाशचे पात्र साकारत आहे. त्याच्याबरोबर अभिनेत्री कुंजिका काळविंट, मधुरा देशपांडे, विशाखा सुभेदार असे दमदार कलाकार प्रमुख भूमिकेत आहे. सध्या या मालिकेत अनेक ट्वीस्ट येताना दिसत आहेत.