आवडत नसूनही ऐश्वर्याची `ही` सवय सहन करते; नणंद श्वेता बच्चनचं `ते` वक्तव्य चर्चेत
Shweta Bachchan and Aishwarya rai :ऐश्वर्या रायचं सासू आणि नणंद श्वेता बच्चन यांच्याशी पटत नाही... याच्या चर्चा सोशल मीडियावर चांगल्याच सुरु असताना श्वेता बच्चननं ऐश्वर्या विषयी केलेलं ते वक्तव्य चर्चेत आलं आहे.
Shweta Bachchan and Aishwarya rai : बॉलिवूडमधील लोकप्रिय आणि सुंदर अभिनेत्री म्हटलं तर ऐश्वर्या रायचं नाव येतं. ऐश्वर्या आज बच्चन कुटुंबाची सुन असली तरी देखील अनेकदा चर्चा असतात की सासू जया बच्चन आणि ननंद श्वेता बच्चन यांच्यासोबत तिचं नातं काही ठिक नाही. ते नेहमीच एकमेकांपासून लांब राहत असल्याचे पाहायला मिळते. त्यावरून आता पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. त्याचं कारण ठरलं आहे ऐश्वर्यानं बिग बींच्या वाढदिवसाच्या निमित्तानं जया बच्चन, नव्या आणि अगस्त्यचा फोटो क्रॉप करत फक्त अमिताभ आणि आराध्याचा फोटो शेअर केला होता. आता या सगळ्यात श्वेताचं एक जूनं वक्तव्य चर्चेत आलं आहे. त्यात श्वेतानं खुलासा केला होता की वहिनी ऐश्वर्याची कोणती गोष्ट आवडत नाही.
'कॉफी विथ करण' या शोमध्ये करण जोहरनं प्रश्न विचारला होता की वहिनी ऐश्वर्या रायची कोणती गोष्ट आहे की जी आवडते आणि कोणती अशी गोष्ट आहे जी आवडतं नाही आणि तिला सहन करावं लागतं. यावर उत्तर देत श्वेता म्हणाली की ती एक सेल्फ मेड आणि स्ट्रॉंग महिला आहे आणि एक अप्रतिम आई आहे. ऐश्वर्याची ही गोष्ट तिला आवडते असं तिनं म्हटलं. तर ऐश्वर्याची कोणती गोष्ट आवडत नाही याविषयी सांगत श्वेता म्हणाली की ती कॉल आणि मेसेज केल्यावर त्यावर लवकर उत्तर देत नाही आणि ती ऐश्वर्याच्या या टाइम मॅनेजमेंटच्या गोष्टीला सहन करते.
दरम्यान, ऐश्वर्यानं संपूर्ण बच्चन कुटुंबाला क्रॉप करत फक्त आराध्या आणि अमिताभ यांचा फोटो शेअर करत बिग बींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. तर दुसरीकडे श्वेतानं संपूर्ण बच्चन कुटुंबाचा फोटो शेअर केला आहे. त्या दोघींनी शेअर केलेल्या या फोटोनंतर सोशल मीडियावर त्यांच्यात वाद असल्याची चर्चा सुरु झाली होती.
सविस्तर वाचा : ...म्हणून अक्षय कुमार पत्नी ट्विंकलबरोबर राजकीय चर्चा टाळतो, स्वत: चं सांगितलं कारण
फॅशन वीकमध्ये लावली होती ऐश्वर्या आणि नव्यानं हजेरी
इतकंच नाही तर ऐश्वर्या आणि नव्या या दोघी यावेळी लॉरियल फॅशन वीकमध्ये दिसल्या होत्या. त्यावेळी बच्चन कुटुंबाच्या चाहत्यांना आनंद झाला होता की त्या कुटुंबातील दोन लोक यावेळी रॅम्प वॉक करताना दिसले. या दरम्यान, श्वेतानं फक्त तिची लेक नव्याचा रॅम्पवरील फोटो शेअर केला होता. तर त्यासोबत आई जया बच्चन आणि तिला नव्याचा किती अभिमान आहे आणि त्यांनी काय केलं हे सांगितलं. तर त्यांनी शेअर केलेल्या कोणत्याही फोटोत ऐश्वर्या नव्हती. ऐश्वर्यानं देखील त्यांच्यासोबत फोटो शेअर केले नाही. तिनं फक्त तिचेच फोटो शेअर केले होते.