Akshay Kumar and Twinkle Khanna : राजकारण आणि अभिनय हे दोन असे क्षेत्र आहेत जे नेहमीच घरात, मित्र-मंडळी, ऑफिस आणि सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतात. त्यावेळी आपल्याच ओळखीच्या अनेक लोकांसोबत आपले मतभेद झाल्याचे आपण पाहतो. कारण आपण ज्या पद्धतीनं एखाद्या गोष्टीचा विचार करतो तसं समोरची व्यक्ती देखील करेल असं नाही. त्यावेळी यावरून कधी आणि कोणात वाद होईल हे आपण सांगू शकत नाही. त्यामुळे अनेकदा पती-पत्नीच्या नात्यात फूट पडते किंवा भांडण होतं. हे कहानी फक्त सर्वसामान्य लोकांच्या घरची नाही तर सेलिब्रिटींच्या घराची देखील आहे. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि त्याची पत्नी ट्विंकल खन्ना या दोघांमध्ये राजकारणाविषयी असलेल्या मतभेदावर अभिनेत्यावर वक्तव्य केलं आहे.
सध्या अक्षय हा नुकत्याच प्रदर्शित झालेल्या त्याच्या 'मिशन रानीगंज' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं अक्षय प्रमोशन करत असताना नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यानं पत्नी ट्विंकलसोबत राजकीय मतभेदावर वक्तव्य केलं आहे. अक्षयनं 'एएनआय'ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले ट्विंकलसोबत तो राजकीय गोष्टींवर चर्चा करत नाही कारण तिचे विचार वेगळे आहेत. अक्षय म्हणाला की 'राजकीय गोष्टींवर माझी पत्नी ट्विंकलचे विचार पूर्ण वेगळे आहेत. त्यामुळे आम्ही एकमेकांवर कोणतीही गोष्ट लादत नाही की तुला हे पटलंच पाहिजे. अशा गोष्टींवर चर्चा करण आम्ही टाळतो कारण त्यावर चर्चा करण्यात काही अर्थ नाही. त्याचं कारण आपल्याला माहित असतं की समोरची व्यक्ती वेगळा विचार करते आणि माझा विचार वेगळा आहे.'
जोडीदारासोबत आनंदी राहण्याचा मंत्र सांगत अक्षय म्हणाला की 'आपण आनंदानं राहतो, पण तुम्हाला माहिती ते बोलतात ना की आपण कधीच एकमेकांपासून काही लपवायला नको, पण मी असं म्हणतो की कधी-कधी असं करणं गरजेचं असतं. कारण त्याचं काही समानधान नाही आहे. काही गोष्टींना लपवून ठेवा आणि आनंदानं रहा.'
हेही वाचा : 'आप राजनिती संभालीये जीसकी...'; Sam Bahadur चा खणखणीत टिझर पाहिला का?
एकिडकडे जिथं अक्षय देशातील सत्ताधारी सरकारच्या समर्थनात दिसतो, तिथंच त्याची पत्नी ट्विंकल मात्र, याच सरकारविरोधी भूमिका प्रकर्षानं मांडताना दिसते. म्हणून घरात असणाऱ्या या दोन परस्पर विरोधी मतांमुळंही ही जोडी चर्चेचा विषय ठरते. तर एका मुलाखतीत याविषयी न कळत अक्षय बोलताना दिसला आहे. अक्षयनं 'कॉफी विथ करण'मध्ये हजेरी लावली होती त्यावेळी त्याला करणनं विचारलं होतं की कोणत्या सेलिब्रिटीचं इन्स्टाग्राम तो स्टॉक करत असतो. त्यावर उत्तर देत अक्षय म्हणाला होता की 'मला असं वाटतं की माझ्या पत्नीचं इन्स्टाग्राम कारण तुम्हाला कधीच कल्पना नसते की ती कधी लिहेल. मला नेहमीच काळजी घ्यावी लागते. मला सतत तिच्या अकाऊंटवर लक्ष ठेवावं लागतं.'
|
SCO
(20 ov) 170/7
|
VS |
NEP
171/3(19.2 ov)
|
| Nepal beat Scotland by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
CAN
(20 ov) 173/4
|
VS |
NZ
176/2(15.1 ov)
|
| New Zealand beat Canada by 8 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
AUS
(20 ov) 181
|
VS |
SL
184/2(18 ov)
|
| Sri Lanka beat Australia by 8 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.