मुंबई : अभिनेत्री श्वेता तिवारी टी.व्ही विश्वातील प्रसिद्ध कलाकारांपैकी एक आहे. पण गेल्या काही दिवसांपासून ती अनेक अडचणींचा सामना करत आहे. काही दिवसांपूर्वी तिच्या पतीने तिच्यावर मानहानीचा गंभीर आरोप केला. त्यानंतर तिच्या एका कर्मचाऱ्याने तिच्यावर आर्थिक फसवणुकीचे आरोप केले होते. याप्रकरणी तिला कायदेशीर नोटीस देखील पाठविण्यात आली आहे. श्वेतावर फसवणुकीचा आरोप करणाऱ्या कर्मचाऱ्याचे नाव राजेश पांडे असं आहे. राजेश पांडे हे श्वेताच्या ऍक्टिंग स्कूलमध्ये शिक्षण म्हणून कार्यरत होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्वेताने मुंबईमध्ये ऍक्टिंगचे क्लास सुरू केले होते. त्या ऍक्टिंग क्लासचे नाव ‘Shweta Tiwari’s Creative School of Acting’ असं होतं. राजेश पांडे या स्कूलमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत होते. मी श्वेता तिवारीच्या स्कूलमध्ये २०१२ पासून शिक्षक म्हणून काम करत होतो. पण डिसेंबर २०१८ महिन्याचा पगार आणि TDSचे पैसे देखील तिने मला दिले नाही. असे आरोप राजेश यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केलं आहे. 


श्वेता तिवारीने राजेश पांडेचे ५० हजार रूपये थकविल्याचा आरोप तिचा पती अभिनव कोहली याने केला. राजेश हा ५ वर्षांपासून तिच्या शाळेत अभिनय शिक्षक म्हणून काम करत आहे. परंतु गेल्या २ वर्षांपासून स्कूलमध्ये मुलं येत नसल्याचं लक्षात येताच तिने ऍक्टिंग स्कूल बंद करण्याचा निर्णय घेतला.