सलमान खान आणि पलक तिवारीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी
अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी संबधित मोठी बातमी समोर येत आहे
मुंबई : अभिनेता सलमान खान सध्या त्याच्या आगामी 'भाईजान' चित्रपटामुळे चर्चेत आहे. आता बातम्या येत आहेत की, सलमानच्या या चित्रपटात अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीची एन्ट्री झाली आहे. नुकतंच निर्मात्यांनी चित्रपटाचे टायटल 'कभी ईद कभी दिवाळी' वरून 'भाईजान' असं बदललं आहे. गेल्या काही दिवसांपासून आलेल्या रिपोर्ट्समध्ये 'बिग बॉस-१३' फेम शहनाज गिल या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार असल्याचं समोर आलं होतं.
सलमान खानने स्वतः पलक तिवारीला कास्ट केलं
रिपोर्टनुसार पलक तिवारीला 'भाईजान'साठी मोठी आणि महत्त्वाची भूमिका ऑफर करण्यात आली आहे. या चित्रपटात पलक पंजाबी गायक आणि अभिनेता जस्सी गिलसोबत दिसणार आहे. रिपोर्ट्समध्ये असंही सांगण्यात आलं आहे की, पलकने चित्रपटाचं शूटिंग देखील सुरू केलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमानने स्वतः पलकला या चित्रपटासाठी कास्ट केलं आहे. या चित्रपटात पलक आणि जस्सी यांचं एक गाणं देखील असणार आहे.
फरहाद सामजी दिग्दर्शित या चित्रपटात सलमान खान, शहनाज गिल, पलक तिवारी आणि जस्सी गिल यांच्याशिवाय व्यंकटेश, पूजा हेगडे, राघव जुयाल आणि सिद्धार्थ निगम यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. पलकने याआधीही आपल्या स्टाईलने प्रेक्षकांना प्रभावित केलं आहे. तिचं 'बिजली-बिजली' हे गाणं चांगलेच व्हायरल झालं आणि चाहत्यांनाही ते खूप आवडलं. अशा परिस्थितीत पलकला सलमानच्या चित्रपटात पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.