मुंबई : लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारीने आपल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे. तिने एक निवेदन जारी केले आहे, ज्यामध्ये तिच्या शब्दांचा गैरसमज झाल्याचे सांगण्यात आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तिने धार्मिक भावना दुखावल्याबद्दल सर्वांची माफी मागितली आहे. 'ब्रा आणि भगवान' (देव माझ्या 'ब्रा'चं माप घेत आहे) या विधानात श्वेता वाईटरित्या अडकली होती. या प्रकरणी तिच्यावर एफआयआरही दाखल करण्यात आली होती.


श्वेता तिवारीने तिच्या निवेदनात लिहिले आहे की, 'माझ्या लक्षात आले आहे की, माझ्या सहकलाकाराच्या पूर्वीच्या व्यक्तिरेखेबाबत माझ्या विधानाचा गैरसमज आणि विपर्यास करण्यात आला.


मी स्वतः देवावर विश्वास ठेवते, त्यामुळे जाणून बुजून किंवा नकळत कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता, पण माझ्या बोलण्याने कोणाला दुखावायचे नाही, त्यामुळे मी माफी मागतो.


श्वेता तिवारी एका वेब शोसाठी भोपाळला गेली होती. त्यावेळी पत्रकार परिषदेदरम्यान एकच हशा पिकला आणि यादरम्यान श्वेता म्हणाली, देव माझ्या 'ब्रा'चं माप घेत आहे'. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. श्वेतावर सर्वत्र टीका होऊ लागली.