मुंबई : टीव्हीची लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारीही सौंदर्याच्या बाबतीत भल्या-भल्या अभिनेत्रींना कॉम्पिटीशन देते. वयाच्या 41 व्या वर्षीही श्वेताच्या सौंदर्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. श्वेता तिवारीने एकता कपूरच्या कसौटी जिंदगी या मालिकेतील प्रेरणा या भूमिकेतून घराघरात आपली छाप पाडली होती. श्वेता तिच्या बिंधास्त शैलीसाठीही ओळखली जाते. आता अभिनेत्रीने एका पोस्टच्या माध्यमातून आपल्याला तिरस्कार करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरं तर, श्वेता तिवारीने इन्स्टाग्रामवर तिचे काही लेटेस्ट फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये श्वेता प्रिंटेड ड्रेसमध्ये कॅज्युअल लूकमध्ये दिसत आहे. या सगळ्या फोटोंमध्ये श्वेता तिवारी वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे. कॅज्युअल लूकमध्येही अभिनेत्री खूपच सुंदर दिसतेय. हे फोटो शेअर करत श्वेताने एक मजेशीर कॅप्शनही लिहिलं आहे.



श्वेता तिवारीने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ती इतकी का हसतेय? तुझ्या बापाचं काय जातं?...  हे कॅप्शन वाचून हे स्पष्ट झालं आहे की, श्वेताने तिच्या  हेटर्संना तिच्या खास शैलीत प्रत्युत्तर दिलं आहे. फोटोमध्ये, श्वेता तिच्या आनंदी हास्याने ट्रोलर्सना जळवत आहे. तर दुसरीकडे श्वेता तिवारीची ही पोस्ट तिच्या चाहत्यांना खूप आवडली आहे. श्वेताचे चाहते तिच्या दमदार स्टाइलचं कौतुक करत आहेत. दुसरीकडे, फोटोतील श्वेताच्या लूकबद्दल बोलायचं झालं तर, अभिनेत्री पेस्टल कलरच्या सिंपल गाऊनमध्ये खूप सुंदर दिसत आहे.