Shweta Tiwari On Failed Marriages : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारी तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. तिनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिच्या दोन्ही अपयशी लग्नांवर वक्तव्य केलं आहे. तिनं यावेळी हे देखील सांगितलं की दुसऱ्या कास्टमध्ये लग्न केल्यामुळे तिच्या आईला लोकांचे टोमने ऐकावे लागले होते. तिच्या लग्नावर आधीच लोकं टीका करत होते. ती तिची लेक पलकमुळे या गुंतलेल्या नात्यात अडकली होती. तिनं हे देखील सांगितलं की तिनं ज्या-ज्या लोकांना सोडलं आज ते पश्चाताप करत आहेत. 


पुन्हा पुन्हा झाला विश्वासघात


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्वेता तिवारीनं 'गलाटा इंडिया'शी बोलताना सांगितलं की 'जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा धोका मिळतो तेव्हा त्याचा तुम्हाला खूप त्रास होतो. तुम्ही रडता, तुम्हाला वाटतं की देव माझ्यासोबत का नाही? तुम्ही त्या सगळ्या गोष्टीला आधीसारखं करण्याचा प्रयत्न करता. ते ठीक करण्यासाठी तुम्ही हवे ते प्रयत्न करताना दिसतात. दुसऱ्यांदा जेव्हा असं होतं. तेव्हा तुम्हाला जाणीव होते की हे सगळं कधीच थांबणारं नाही. हे असंच सुरु राहणार. जेव्हा तिसऱ्यांदा तुम्हाला धोका मिळतो, तेव्हा तुम्हाला या गोष्टीचं वाईट वाटत नाही. त्याचा तुमच्यावर कोणताही परिणाम होत नाही. आता जेव्हा कोणी मला धोका देतं, जेव्हा कोणी मला दु: ख देत. तेव्हा मी त्यांच्याकडे तक्रार करत नाही. मी फक्त स्वत: ला लांब करुन घेते. मला दु: ख देणं हे त्यांचं व्यक्तीमत्त्व आहे आणि आता हे माझ्या व्यक्तिमत्त्वाचा भाग झालंय की मी दु:खी होत नाही.'



त्यांना झाला पश्चाताप 


पुढे श्वेता म्हणाली, 'मी आता त्याकडे लक्ष देत नाही आणि त्यानंतर अचानक त्यांना या गोष्टीची जाणीव झाली की ओह, ती गेली. आतापर्यंत मला हे जाणवलं की ज्या लोकांच्या आयुष्यातून मी निघाले त्यांना पश्चाताप होतोय.' 


लोकांनी आईला मारले टोमने


श्वेताला पुढे विचारलं की 'तिला या गुंतलेल्या नात्यातून बाहेर येण्यासाठी इतका वेळ का लागला? तर त्यावर उत्तर देत तिनं म्हटलं की माझ्या संपूर्ण कुटुंबात कधीच कोणी लव्ह मॅरेज केलं नव्हतं. मी केलं. आमच्या कुटुंबात जातीवर अनेक समस्या देखील होत्या, तरी देखील मी इंटर-कास्ट लग्न केलं. लोकांनी आधी माझ्या आईला टोमने मारले आणि माझ्या लग्नाला नावं ठेऊ लागले होते.' 


बाळासाठी अव्यवस्थित कुटुंबात राहणं...


श्वेतानं पुढे सांगितलं की 'तिनं घटस्फोटाचा अर्ज दिला असता तर हे संपूर्ण वेगळंच झालं असतं. त्यावेळी असं काही नव्हतं की मी आर्थिकरित्या मी स्थिर नव्हते, तर हा एक भावनिक क्षण होता. मी माझ्या लेकीच्या मोठं होण्यावर आणि तिच्यासोबत तेव्हा वडील नसतील तर त्या कारणामुळे चिंतेत होती. त्यानंतर मला या गोष्टीची जाणीव झाली की तुमचं कुटुंब तेव्हाच आनंदी राहू शकतं, जेव्हा तुम्ही मानसिकरित्या आनंदी आहात. आपल्या बाळासाठी एक अव्यवस्थित कुटुंबात राहणं, हे चांगल्या पालकत्व नाही. जर दोन लोकं एकत्र मुलांना सांभाळू शकत नसतील तर विभक्त होणं योग्य ठरतं.' 


हेही वाचा : 'यामुळे माझं नाव खराब होतंय'; युट्यूबर अरमान मलिकच्या कृतीमुळे या गायकाला होतोय त्रास


श्वेतानं पहिलं लग्न राजा चौधरीशी केलं होतं. दोघांना एक मुलगी असून पलक असं तिचं नाव आहे. राजा चौधरीपासून विभक्त झाल्यानंतर श्वेतानं अभिनव कोहलीशी लग्न केलं होतं. दोघं त्यावेळी 3 वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. त्यांना एक मुलगा असून त्याचं नाव रेयांश असं आहे. तर श्वेतानं अभिनववर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला होता.