मुंबई : 'कसोटी जिंगदी की...' या मालिकेच्या माध्यमातून घरा-घरात पोहोचलेली अभिनेत्री श्वेता तिवारी पुन्हा एकदा चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. ती लवकरच एकता कपूर प्रोडक्शनच्या माध्यमातून 'हम तुम और देम' नावाच्या वेब सीरिजमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या वेब सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या सीरिजच्या माध्यमातून ती डिजिटल विश्वात पदार्पण करणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


'सब का हक है एक और मौके का' प्रत्येकाला आयुष्यात संधी मिळणं हा प्रत्येकाचा हक्क आहे. वेबसीरिजची कथा श्वेताच्या विवाहबाह्य संबंधांभोवती फिरताना दिसत आहे. अभिनेता अक्षय ओबेरॉय तिच्या बॉयफ्रेंडची भूमिका साकारताना दिसत आहे. सीरिजमध्ये तिचा बोल्ड अंदाज तुम्हाला आश्चर्यचकित करणारा आहे. 


सीरिजमध्ये तिच्या मुलीला आपल्या आईचे एका अनोळख्या इसमासोबत असलेले संबंध मान्य नसतात. त्यामुळे श्वेतावर मुलगी नाहीतर बॉयफ्रेंड यांपैकी एकाला निवडण्याचा प्रसंग ओढावलेचं दाखवण्यात आलं आहे. 


सीरिजमधील श्वेता आणि अक्षयची केमेस्ट्री आणि बोल्ड सीन प्रेक्षकांना ६ डिसेंबर २०१९ रोजी अनुभवता येणार आहे. ALT Balaji आणि Zee5 वर ही वेबसीरिज प्रदर्शित करण्यात येणार आहे.