मुंबई : स्वप्न पूर्ण झाले की डोळ्यात आनंदाश्रू येतात. असाच काहीसा प्रकार बॉलिवूड अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीसोबत घडला, जेव्हा त्याची भेट 'बिग बॉस 15' या रिअॅलिटी शोमध्ये सलमान खानसोबत झाली. त्याला आपले अश्रू आवरता आले नाहीत आणि तो खूप भावूक झाला. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये सलमानला भेटल्यानंतर सिद्धांत चतुर्वेदी भावूक झाल्याचे पाहायला मिळत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सलमानला पाहून सिद्धांत रडू लागला


सिद्धांत चतुर्वेदी त्याच्या 'बंटी और बबली 2' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी 'बिग बॉस'मध्ये पोहोचला होता. यावेळी राणी मुखर्जी आणि शर्वरी वाघही उपस्थित होत्या.


जेव्हा सिद्धांत चतुर्वेदी शोमध्ये सलमान खानला भेटतो आणि त्याचा हात धरतो तेव्हा राणी मुखर्जी विचारते, 'तू इतका घाबरलेला का दिसत आहेस?' यावर सिद्धांत चतुर्वेदी सलमानला म्हणतो, 'मी तुझा मोठा चाहता आहे, कसं सांगू. डोळ्यात पाणी येत आहे. यानंतर सलमान पुढे जाऊन सिद्धांत चतुर्वेदीला मिठी मारतो.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 


 सिद्धांत चतुर्वेदीने 2019 मध्ये रिलीज झालेल्या 'गली बॉय' या चित्रपटाने आपल्या करिअरची सुरुवात केली होती, जो बॉक्स ऑफिसवर खूप हिट ठरला होता. या चित्रपटात त्याने रणवीर सिंग आणि आलिया भट्टसोबत काम केले होते. सिद्धांत चतुर्वेदीचे 'एमसी शेर' हे पात्र खूप आवडले. आता तो 'बंटी और बबली 2' मध्ये दिसणार आहे. सैफ अली खान देखील या चित्रपटाचा एक भाग आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन वरुण व्ही शर्मा यांनी केले आहे.