`युद्धरा` चित्रपटातील गाण्यावर सिद्धांत चतुर्वेदीचा डान्स! हृतिक रोशन म्हणाला...
Siddhant Chaturvedi Yudhra Hrithik Roshan : सिद्धांत चतुर्वेदीचा डान्स पाहताच हृतिक रोशन म्हणाला...
Siddhant Chaturvedi Yudhra Hrithik Roshan : बॉलिवूड अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीचा 'युद्धरा' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातील गाण्यांवरही सिद्धांत चतुर्वेदीच्या डान्स मूव्ह्स पाहायला मिळणार आहेत. अलीकडेच सिद्धांत चतुर्वेदीनं 'युद्धरा' मधील 'हट जा बाजु' या लोकप्रिय गाण्याचा पडद्यामागचा (BTS) व्हिडिओ शेअर केला. ज्यामध्ये सिद्धांत चतुर्वेदी मस्तीमध्ये नाचताना दिसत आहेत. हृतिक रोशनला या BTS व्हिडिओमधील सिद्धांत चतुर्वेदीचं डान्स स्किल्स आवडले की नाही हे सांगत त्यानं या व्हिडिओवर कमेंट केली आहे.
सिद्धांतनं शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये 'बाजू हात जा'चे कोरिओग्राफर पियुष भगत आणि शाझिया सामजी देखील सिद्धांतसोबत डान्स करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ लाईक करत हृतिक रोशननं कमेंट करत लिहिलं की, 'Amazing work guys'. साहजिकच हृतिक रोशनकडून प्रशंसा मिळाल्यानंतर सिद्धांत चतुर्वेदीच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. अशा परिस्थितीत, हृतिक रोशनची कमेंट वाचल्यानंतर, सिद्धांतने कमेंट करत हात जोडल्याचं इमोटीकॉन शेअर केलं आहे आणि या कौतुकाबद्दल हृतिक रोशनचे मनापासून आभार मानले.
लक्षवेधी गोष्ट ही आहे की हृतिक रोशन हा बॉलिवूडमधला एक उत्तम अभिनेता आणि तसेच उत्कृष्ट डान्सर म्हणून ओळखला जातो. आपल्या 25 वर्षांच्या कारकिर्दीत, हृतिक रोशनने अनेक डान्स नंबरमध्ये त्याचे डान्स सिक्ल्स दाखवले आहेत. त्यामुळे चाहत्यांच्या मनात त्यानं एक विशेष स्थान मिळवले आहे. तो हिंदी चित्रपटसृष्टीतील डान्सचे कौतुक करणं ही काही छोटी गोष्ट नाही असं म्हटलं आहे. म्हणूनच हृतिक रोशनच्या कमेंटनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. सिद्धांत हा स्वतः हृतिक रोशनचा खूप मोठा चाहता आहे आणि तो हृतिक रोशनचे चित्रपट बघतच मोठा झाला आहे. अशा परिस्थितीत, त्याच्या स्क्रीन आयडलकडून प्रशंसा मिळवणं हा सिद्धांतसाठी एक अविस्मरणीय अनुभव आहे, जो तो कधीही विसरू शकणार नाही.
'युद्धा' चित्रपटात अँग्री यंग मॅनच्या अवतारात दिसणारा सिद्धांत चतुर्वेदीच्या प्रेमाच्या भूमिकेत मालविका मोहननही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. सिद्धांत आणि मालविकाशिवाय राघव जुआल, राज अर्जुन, शिल्पा शुक्ला, गजराज राव, राम कपूर यांसारखे अनुभवी कलाकारही या चित्रपटात विशेष भूमिकेत दिसणार आहेत.
हेही वाचा : 'तुंबाड' नं 5 व्या दिवशीही केली बक्कळ कमाई; करीनाच्या 'द बकिंघम मर्डर्स' ला टाकलं मागे
उल्लेखनीय गोष्ट ही आहे की, अक्षित घिलडियाल आणि श्रीधर राघवन यांनी लिहिलेल्या 'युद्धरा' चित्रपटाचे संवाद फरहान अख्तरनं लिहिले आहे. एक्सेल एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांनी संयुक्तपणे 'युद्धरा' चित्रपटाची निर्मिती केली आहे. 20 सप्टेंबर रोजी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये 'युद्धरा' हा ॲक्शनपॅक्ड चित्रपट प्रदर्शित होणार आहे.