मुंबई : एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ .... प्रत्येक कामात एकमेकांना मदत केली तर ते काम उत्तमच होतं. मग ते व्यावसायिक असो वा खासगी... मराठी सिनेसृष्टीतील चॉकलेट बॉय सिद्धार्थ चांदेकर सध्या चर्चेत आहे ते त्याच्या एका वेगळ्या कामामुळे. अभिनेता म्हणून समोर आलेला सिद्धार्थ स्टायलिस्ट देखील असल्याचं स्पष्ट झालं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिद्धार्थ चांदेकर आपल्या भावी पत्नीसाठी स्टायलिश बनला आहे. अभिनेत्री मिताली मयेकर आणि सिद्धार्थ चांदेकरचा जानेवारी महिन्यात साखरपुडा पार पडला आहे. हे दोघं कायमच आपल्या इंस्टाग्राम पोस्टमुळे चर्चेत असतात. आताही तिने एक पोस्ट शेअर केली आहे ज्यामधून सिद्धार्थमधील स्टायलिश समोर आला आहे. 



मितालीने शेअर केलेल्या फोटोत ती अतिशय स्टनिंग आणि बोल्ड दिसत आहे. या फोटोमागील व्यक्तींना तिने क्रेडिट्स दिलं आहे. त्यामध्ये स्टायलिश म्हणून सिद्धार्थ चांदेकरच्या नावाचा उल्लेख आहे. तिच्या या पोस्टने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. 



मितालीने गुलाबी रंगाच्या ड्रेसमधील फोटो शेअर केला आहे. यामध्ये ती अतिशय स्टनिंग दिसत आहे. गुलाबी ड्रेसला मॅचिंग अशी मॅट लिपस्टिक तिने लावली आहे. 



सिद्धार्थ आणि मिताली लवकरच एका ऑस्ट्रेलियन सिनेमात दिसणार आहेत. या सिनेमाच्या चित्रिकरणाकरता दोघेही ऑस्ट्रेलियाला जाऊन आले. जानेवारीत साखरपुडा झालेल्या या जोडप्याच्या लग्नाची सगळेजण आतुरतेने वाट पाहत आहेत.