Siddharth Jadhav : लोकप्रिय मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधव हा लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. सिद्धार्थ हा त्याच्या भन्नाट अभिनयासाठी ओळखला जातो. सिद्धार्थ हा आज फक्त मराठी नाही तर हिंदी चित्रपटांमध्ये देखील कमालीची भूमिका साकारतो. त्याची प्रत्येक भूमिका ही चर्चेचा विषय ठरते. आज सिद्धार्थ जरी यशच्या शिखरावर असला तरी सुद्धा त्यानं आयुष्यात खूप स्ट्रगल केलं आहे. त्याच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती ही सुरुवातीला काही चांगली नव्हती. पण आता त्यानं त्याच्या आई-वडिलांसाठी मुंबईत हक्काच घर खरेदी केलं आहे. पण हे घर घेऊन बराचकाळ झाला आहे. याविषयी सिद्धार्थनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत वक्तव्य केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिद्धार्थनं नुकतीच स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आता होऊ दे धिंगाणा’ या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी त्याचं कुटुंब देखील सामिल झालं होतं. यावेळी सिद्धार्थनं तिच्या वडिलांविषयी सांगितलं की त्यांनी कसं स्टॅगल केलं आहे. याविषयी सांगताना सिद्धार्थ म्हणाला, त्याचे वडील दादर प्लाझा चित्रपटगृहाबाहेर खाली पेपर टाकून झोपायचे. आता त्यानं नुकतीच महाराष्ट्र टाईम्सला मुलाखत दिली होती. यावेळी त्याच्या आईनं कशा प्रकारे त्याला नेहमीच कोणत्या ना कोणत्या परिस्थितीतून वाचवले हे बोलताना म्हणाला, 'तो एकदा नदीत बुडत असताना त्याच्या आईने त्याला वाचावलं. शिवाय दोनदा तो हरवला होता. असं असताना त्याच्या आईनेच त्याला शोधून काढलं. याविषयी सिद्धार्थने स्वतःच खुलासा केला. दरम्यान, गोरेगावमध्ये त्याने त्याच्या आई-वडिलांसाठी घर खरेदी केलं. आई-वडिलांना त्यांच्या हक्काचं घर घेऊन द्यायचं हे त्याचं स्वप्न होतं.'



सिद्धार्थ म्हणाला, मुंबईमध्ये स्थायिक झाल्यापासून सिद्धार्थ आणि त्याचे आई-वडील हे भाड्याच्या घरात राहिले. आता त्यानं त्याच्या आई-वडिलांसाठी हक्काचं घर घेतलं आहे. इतक्या वर्षांनंतर आता कुठे जाऊन घराच्या दरवाज्यावर असणारी नेम प्लेट ही आई-वडिलांच्या नावाची पाहून त्याला खूप आनंद झाल्याचे त्यानं सांगितलं. तर सिद्धार्थनं स्वत: चं हक्काचं घर घेतल्यानं त्याच्या आई-वडिलांना आनंद झाला आहे. याशिवाय दादरच्या प्लाझा चित्रपटगृहाच्या समोर असलेल्या टॉवरमध्ये सिद्धार्थचं एक घर आहे. 


हेही वाचा : देवोलिना भट्टाचार्जीनं पती शाहनवाजसोबत पाहिला The Kerala Story! म्हणाली 'तो मुस्लिम असूनही त्याला त्यात...'


सिद्धार्थनं सह्याद्री वाहिनीवरील ‘एक शून्य बाबुराव’ कार्यक्रमाद्वारे त्याने कलाक्षेत्रामध्ये प्रवेश केला.त्यानं ‘हसा चकट फू’, ‘घडलंय बिघडलंय’ अशा मालिकांमध्ये तो झळकला. त्यानंतर सिद्धार्थनं 2004 मध्ये ‘अगं बाई अरेच्चा’ चित्रपटात काम केलं. या चित्रपटामधील काम पाहून दिग्दर्शक केदार शिंदे यांनी त्याला ‘जत्रा’ चित्रपटामध्ये काम करायची ऑफर दिली. 2006 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गोलमाल’ या चित्रपटातून सिद्धार्थनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानं आजवर अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलं आहे.