Siddharth Jadhav Video: मराठीसोबतच हिंदी चित्रपटांमध्येही आपलं नावं गाजवणाऱ्या सिद्धार्थ जाधवला आज कोण ओळखत नाही. सगळ्यांनाच त्याचा नैसर्गिक अभिनय फार आवडतो. शून्यातून सुरूवात करत सिद्धार्थ आज मराठी चित्रपटसृष्टीतला सुपरस्टार झाला आहे. परंतु नुकत्याच एका शोमधून सिद्धार्थनं आपल्या आयुष्यातील एक हळवा कोपरा शेअर केला आहे. (Siddharth Jadhav Video Actor says he has brought house in front of plaza theatre where hes father used to sleep)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या जबरदस्त एनर्जीनं आणि अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकून घेणारा अभिनेता सिद्धार्थ जाधव नेहमीच प्रेक्षकांच्या चर्चेत असतो. सिद्धार्थ आपल्या अतरंगी स्टाईलसाठी आणि युनिकनेससाठी ओळखला जातो. आपल्या मेहतनीचा प्रवास उलडताना सिद्धार्थचे मात्र डोळे भरून आले आहेत. याच कार्यक्रमातून आपल्या आयुष्यातील एक किस्सा सांगताना सिद्धार्थला अश्रू अनावर झाले आहेत.  


सिद्धार्थ स्टार प्रवाहावरील 'होऊ दे धिंगाणा' या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतोय यावेळी एका हळव्या आठवणीने सिद्धार्थचे डोळे भरून आले. या प्रसंग ऐकून तुमच्या डोळ्यातून नक्कीच पाणी येईल. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


कार्यक्रमाच्या मंचावर सिद्धार्थचे आई- वडील आणि भाऊ त्याला खासकरून भेटायला येतात. त्यांना पाहून सिद्धार्थ शोक होतो. त्यांना मंचावर पाहून सिद्धार्थला जुने दिवस आठवतात व म्हणतो, 'दादरला प्लाझा सिनेमाच्या समोर बाबा पेपर टाकून झोपायचे. आज मी त्याच्या समोरच्या रस्त्यावरच्या टॉवरमध्ये घर घेतलंय.' हे प्रेक्षकांना सांगताना सिद्धार्थचे डोळे भरून येतात. 


कायम इतरांना आनंद देणारा सिद्धार्थ जाधव हा अभिनेता माणूस म्हणून भन्नाट आहेच पण त्याहीपेक्षा तो अधिक हळवा आहे. सिद्धार्थचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्याने स्वतः हा व्हिडीओ त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करता त्याने लिहिलं, 'माझं आयुष्य... आणि मी माझ्या आयुष्यातला प्रत्येक क्षण जगतोय तो फक्त फक्त माझ्या फॅमिली मुळे ... आता होऊ दे धिंगाणा team शब्दच नाहीत..फक्त मनापासून आभार.'