तृप्ती डिमरी-रणबीर कपूरचा बोल्ड सीन पाहून अस्वस्थ झाला चित्रपटातील सहकलाकार; म्हणाला, ``माणसाची विकृती...`
Siddharth Karnick on Ranbir Kapoor Trupti Dimri Scene: तृप्ती डिमरी आणि रणबीर कपूरच्या बोल्ड सीनची सर्वत्र चर्चा आहे. Animal चित्रपटातील पुरूषी मानसिकता, हिंसा आणि तद्दन मसाला पाहून प्रेक्षकांनीही नाना तऱ्हेच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता या सीनवर चित्रपटाच्या सहकलाकारानंही प्रतिक्रिया दिली आहे.
Siddharth Karnick on Ranbir Kapoor Trupti Dimri Scene: गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे ती म्हणजे रणबीर कपूरच्या अॅनिमल या चित्रपटाची. या चित्रपटानं अल्पावधीतच बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली आहे. 1 डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला असून या चित्रपटाचीही बरीच चर्चा आहे. या चित्रपटातील रणबीर कपूर आणि तृप्ती डिमरी यांच्यातील बोल्ड सीनची बरीच चर्चा आहे. यावेळी बॉलिवूडमधून आणि प्रेक्षकांमधून या सीनवर नानातऱ्हेच्या प्रतिक्रियाही येताना दिसत आहेत.
या सीनवर आता एका अभिनेत्यानंही प्रतिक्रिया दिली आहे. अॅनिमल या चित्रपटातील या सीनवर अभिनेता सिद्धार्थ कर्णिक यानं प्रतिक्रिया दिली आहे. सिद्धार्थ हा हिंदी मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. ही सीन पाहिल्यावर आपली अवस्था फार काही बरी नव्हती असं विधान त्यानं यावेळी केलं आहे. परंतु नक्की तो काय म्हणाला आहे हे आपण जाणून घेणार आहोत.
सध्या संदीप रेड्डी वांगा यांच्या Animal या चित्रपटाची बरीच चर्चा आहे. यावेळी या चित्रपटातील कलाकारांचीही चर्चा आहे. त्यांच्या अभिनयाचेही कौतुक केले जाते आहे. यावेळी या चित्रपटातील अभिनेता सिद्धार्थ कर्णिक यानं रणबीर कपूरच्या बोल्ड सीनवर केलेले भाष्य चर्चेत आहे. त्यानं या चित्रपटात रणबीर कपूरच्या मेहूण्याची भुमिका केली आहे. वरूण असं त्याच्या पात्राचं नावं आहे.
नुकतीच त्यानं 'बॉलिवूड हंगामा'ला मुलाखत दिली आहे. त्यानं तो म्हणाला की, ''एक अभिनेता म्हणून मी जे प्रेक्षकांना देणं आहे ती मी दिलंच पाहिजे. त्यानंतर तुम्ही त्यावर कसे व्यक्त व्हाल याची जबाबदारी माझी नाही.'' अॅनिमलच्या त्या सीनबद्दल बोलताना तो म्हणाला की, सीन पाहिल्यानंतर मी अस्वस्थ होतो. परंतु त्याचसोबत मला हेही जाणवलं की व्हा, रणबीर कपूरनं काय तऱ्हेची सुंदर भुमिका निवडली आहे. त्यातून दिग्दर्शकानंही किती सुंदररीत्या ही भुमिका स्विकारली आहे. यातून आपल्याला मानवाची विकृतीही दिसून येते. तो माणूस म्हणून चांगला आहे पण ह्या सुद्धा त्याच्या काही ग्रे शेड्स आहेत. तेव्हा विजय हा विलन होतो. अशाप्रकारे बदलणं हे काही सोप्पं नाही. हा सीन पाहताना मी फारच असवस्थ झालो होतो. पण जेव्हा हा सीन आता पाहतो तेव्हा मला समजते की यात एक चांगली बाजू देखील आहे. यामुळे तूम्ही व्यक्त झालात.''
हेही वाचा : पियुष रानडेच्या तिसऱ्या लग्नानंतर दुसऱ्या पत्नीनं विकत घेतलं नवं घर, मयुरी वाघनं शेअर केली गुडन्यूज
यावेळी अभिनेत्री तृप्ती डिमरीनंही आपल्या या बहुचर्चित सीनवर भाष्य केले आहे. त्यामुळे तिचीही बरीच चर्चा आहे. यावेळी Animal या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कोट्यवधी रूपयांची कमाई केली आहे. यावेळी जगभरातून या चित्रपटानं केलेल्या कमाईची बरीच चर्चाही आहे.