मुंबई : अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर चाहत्यांना आणि कलाविश्वाला मोठा धक्का बसला आहे. गुरूवारी सिद्धार्थच्या निधनाची बातमी सर्वांना कळाली तेव्हा पासून कलाविश्वातील मंडळी सिद्धार्थच्या घरी त्याच्या घरच्यांचं सांत्वन करण्यासाठी पोहोचत आहेत. यावेळी अभिनेता राहूल महाजन याने देखील सिद्धार्थच्या कुटुंबियांची आणि गर्लफ्रेन्ड शेहनाज गिलची भेट घेतली. सध्या शेहनाजची परिस्थिती काय आहे, याबद्दल देखील राहुलने खुलासा केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ईटाइम्सला दिलेल्या मुलाखतीत राहुल म्हणाला, 'गेल्या काही वर्षांपासून आमची भेट झाली नव्हती. पण आमची घट्ट मैत्री होती. मला सिद्धार्थला फोन करायचा होता आणि त्याच्यासोबत वेळ व्यतीत करायचा होता. पण माझं दुर्भाग्य... '  यावेळी राहुलने सिद्धार्थच्या आईच्या स्थितीबद्दल देखील माहिती दिली. 



राहुल म्हणाला; 'सिद्धार्थ एक चांगला आणि वेगळ्या स्वभावाचा व्यक्ती होता. जो आम्हाला अशा परिस्थितीत बिलकूल पाहू शकत नाही. आज त्याच्या आईला देखील भेटलो. त्या म्हणाल्या मृत्यू अटळ आहे. पण इतक्या लवकर...' सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबावर दुखाचं डोंगर कोसळला आहे. 



राहुल महाजनने सिद्धार्थची गर्लफ्रेन्ड शेहनाज गिलच्या स्थितीबद्दल सांगितलं. सिद्धार्थच्या निधनानंतर शेहनाज पूर्णपणे कोलमडली आहे. ती सध्या स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत आहे.