सिद्धार्थ शुक्ला गेल्यानंतर त्याची आई एवढंच म्हणतेय....
प्रसिद्ध टीव्ही अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं वयाच्या 40 व्या वर्षी निधन झालं.
मुंबई : प्रसिद्ध टीव्ही अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं गुरुवारी वयाच्या 40 व्या वर्षी निधन झालं. त्याचबरोबर आज त्याच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. सिद्धार्थच्या जाण्याने सर्वांनाच खूप दुःख झालं आहे. टीव्ही आणि बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी त्याला त्यांच्या पद्धतीने निरोप दिला. दरम्यान, अभिनेत्री राखी सावंतनेही इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये राखी खूप भावूक झालेली दिसत आहे.
इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत राखीने लिहिलं आहे की, "मी नुकतीच सिद्धार्थच्या घरातून येत आहे. सिद्धार्थच्या आईला भेटले. तिची आईची स्थिती ठीक नाही. ती फक्त एकच गोष्ट सांगत आहे की 'वो चला' गया. ' मी तिला म्हणाले की तुझा मुलगा तुझ्यासोबत आहे. तो कुठेही गेला नाही. "
राखीने सिद्धार्थच्या आईला सांगितलं
राखीने व्हिडिओमध्ये पुढे म्हटलं आहे की, "मी तिच्या आईला सांगितलं आहे की, त्याचं शरीर फक्त सोडून गेलं आहे. आत्मा कायम आपल्यासोबत राहणार आहे. तिच्या घराची स्थिती अजिबात ठीक नाही. प्रत्येकजण खूप धक्क्यात आहे." राखी म्हणाली की सिद्धार्थची आई सदम्यात आहे. तिची प्रकृती अत्यंत वाईट आहे. या दरम्यान राखीच्या डोळ्यातून अश्रू बाहेर आले.
सिद्धार्थच्या मृत्यूनंतर कुटुंबाने एक निवेदन जारी केलं
आदल्या दिवशी, सिद्धार्थ शुक्लाच्या कुटुंबाने त्याच्या टीमद्वारे एक निवेदन जारी केलं आहे, "आम्ही सगळेजण दुःखात आहोत. आम्हाला तुमच्यासारखाच धक्का बसला आहे. आणि आपल्या सर्वांना माहित आहे की, सिद्धार्थ एक व्यक्ती आहे जो स्वतःपुरता मर्यादित आहे. म्हणून कृपया त्याच्या गोपनीयतेचा, त्याच्या कुटुंबाच्या गोपनीयतेचा आदर करा. कृपया प्रत्येकाने त्याच्या आत्म्याला शांती लाभो अशी प्रार्थना करा."