मुंबई : अभिनेता सिद्धार्थ कपूरने 2012 साली प्रदर्शित झालेल्या आणि करण जोहर दिग्दर्शित 'स्टुडंट ऑफ द इयर'  चित्रपटाच्या माध्यमातून अभिनयास सुरूवात केली. 'कपूर एन्ड सन्स', 'बार-बार देखो' आणि 'ए जेंटलमॅन' यांसारख्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रसिद्धीझोतात आलेल्या सिद्धार्थच्या करियरला कलाटणी 'शेरशाह' चित्रपटातून मिळाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेक तरूणींच्या मनातील ताईद असलेला सिद्धार्थ त्याच्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असतो. सिद्धार्थ सध्या अभिनेत्री कियारा आडवाणीला डेट करत आहे. पण याआधी देखील बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींसोबत त्याचं नाव जोडण्यात आलं आहे. 


अभिनेत्री आलिया भट्ट
सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि आलिया भट्ट यांनी 'स्टुडंट ऑफ द इयर' या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यांना अनेक प्रसंगी एकत्र पाहण्यात आलं. पण त्यांनी कधीही त्यांचे नाते अधिकृत केलं नाही.


अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस
सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि जॅकलिन फर्नांडिस हे 'ब्रदर्स' आणि 'ए जेंटलमॅन' चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आले. तेव्हा दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याचं देखील बोललं जात होत. पण त्यांनी कधी त्यांचं नातं मान्य केलं नाही.


अभिनेत्री तारा सुतारिया 
तारा सुतारिया  आणि सिद्धार्थ 'मरजावां' चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आले. दोघांच्या नात्याची देखील चर्चा रंगली. 


अभिनेत्री कियारा आडवाणी
'शेरशाह'मध्ये सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी यांची जोडी एकत्र दिसली होती. रिपोर्ट्सनुसार दोघेही एकमेकांना डेट करत आहेत.