मुंबई : इंडस्ट्रीतील अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे हृदयविकाराच्या झटक्याने गुरूवारी निधन झाले. सिद्धार्थ शुक्लाने बुधवारी रात्री झोपण्यापूर्वी काही औषधे घेतली होती. मात्र तो सकाळी उठलाच नाही. रूग्णालयात दाखल केल्यानंतर त्याच निधन झालं. निधनानंतर सिद्धार्थ शुक्लाचं पोस्टमार्टम केलं गेलं. आज शुक्रवारी सिद्धार्थ शुक्लावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरूवारी सकाळी साडे तीनच्या सुमारास सिद्धार्थ उठला. आईकडे सिद्धार्थने पाणी देखील मागितलं. दुसऱ्या दिवशी आईने उठवण्याचा प्रयत्न देखील केली. मात्र तो उठला नाही म्हणून त्यांनी मुलीला फोन केला. मुलगी आणि जावई घरी आल्यानंतर त्याला कूपर रूग्णालयात नेण्यात आलं. त्याला रूग्णालयात 9.40 ला नेण्यात आलं. त्यानंतर त्याला मृत घोषित करण्यात आलं.  


सिद्धार्थ शुक्लाच्या ट्रेनरने व्यक्त केली भावना 


सिद्धार्थ शुक्लाच्या आईची आणि शहनाज गिलची अवस्था अतिशय कठीण आहे. सिद्धार्थचं असं अकाली जाणं सगळयांनाच धक्का लावून देणार आहे. दोघींची अवस्था फार बेकार आहे. ट्रेनर म्हणाला- मी सिद्धार्थच्या आईजवळ बसलो होतो. ती म्हणाली की तिला विश्वास बसत नव्हता. त्यांना वाटते की मागून तो येईल आणि म्हणेल की, आई मला हे दे, आई माझ्याशी ते कर. सिद्धार्थची आई मला सांगू लागली, माझा मुलगा तुझ्याशी खूप एकरूप झाला होता. तुम्ही लोक दिवसातून किती वेळा बोललात? 


हे खरे आहे की सिद्धार्थ मला झोपायच्या आधी फोन करायचा आणि तो सकाळी उठल्याबरोबर माझ्याशी बोलायचा. भाई मी झोपणार आहे म्हणून सकाळी माझा फोन उठव. सिद्धार्थला त्याच्या आईची खूप काळजी होती, कारण सिद्धार्थ त्याच्या आईच्या सर्वात जवळचा होता. शहनाजही तिथे बसली आहे. शहनाज सिद्धार्थच्या घरी आहे. ती देखील बेशुद्ध आहे.