Sidharth Shukla Death : सिद्धार्थच्या मृत्यूवर पोलिसांनी दिली माहिती, या कारणामुळे झालं निधन?
मुंबई पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
मुंबई : बिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याचं निधन झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार 40 वर्षीय अभिनेत्याच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. मुंबई पोलिसांनी अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन का झालं याबाबत माहिती दिली आहे.
बुधवारी रात्री 9.30 वाजता सिद्धार्थ शुक्ला बेशुद्ध अवस्थेत होता. त्यानंतर त्याला जवळच्या कूपर रूग्णालयात दाखल करण्यात आलं. सिद्धार्थ शुक्लाची बहिण आणि त्याचे भावोजी रूग्णालयात दाखल झाले. पोलिसांनी अभिनेत्याच्या निधनाची माहिती आज सकाळी मिळाली. पोस्टमार्टम रिपोर्टनंतर मृत्यूचं नेमकं कारण समजू शकेल. (Sidharth Shukla Death : झोपण्यापूर्वी घेतली होती काही औषध, नंतर उठलाच नाही)
सिद्धार्थ शुक्लाचे पोस्टमार्टम दुपारी 12.30 नंतर केले जाणार आहे. त्यानंतर त्याच्या कुटुंबियांना आणि जवळच्या व्यक्तींना माहिती दिली जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धार्थच्या शरीरावर कोणतीही जखम नाही. पोलीस या प्रकरणाबाबत कोणतीच माहिती घाईत देत नाही. पोलिसांना ऑन रेकॉर्ड सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. त्यामुळे ते मेडिकल रिपोर्टची वाट पाहत आहेत.
सिद्धार्थने झोपण्या अगोदर घेतलं औषध
मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ शुक्लाने झोपण्यापूर्वी काही औषध घेतली होती. ज्यानंतर तो सकाळी उठूच शकला नाही. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ शुक्लाला हार्ट अटॅक आला. बुधवारी रात्री तो अगदी फिट होता. कोणताच आजार नसताना सिद्धार्थने या जगाचा निरोप घेतला आहे. (Sidharth Shukla Death: सिद्धार्थ शुक्लाची शेवटची इंस्टाग्राम पोस्ट, या लोकांचे मानले आभार)
सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाची बातमी कळताच मैत्रिण आणि अभिनेत्री शहनाज गिल शुटिंग सोडून तात्काळ निघाली आहे. शहनाज गिल सिद्धार्थच्या अगदी जवळ होती. काही दिवसांपूर्वी दोघांनी एकमेकांसोबत डान्स दिवानेमध्ये परफॉर्म केलं होतं. (धक्कादायक... अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन)