मुंबई : अभिनेता Siddharth Shukla च्या निधनाने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. वयाच्या 40 व्या वर्षी सिद्धार्थ शुक्लाचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार सिद्धार्थचं निधन हे रात्री झोपेतच झालं आहे. हार्ट अटॅकनंतर सिद्धार्थ शुक्लाचा मृतदेह मुंबईत ब्रीच कँडी रूग्णालयात नेण्यात आलं आहे. पोस्टमार्टम केल्यावर मृत्यूचे नेमके कारण समजू शकेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिद्धार्थ शुक्ला यांचं शेवटची इंस्टाग्राम पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. सिद्धार्थ शुक्लाने 24 ऑगस्ट रोजी इंस्टाग्रामवर फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये त्याने अत्यावश्यक सेवेच्या कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत. सिद्धार्थ शुक्लाने आपला फोटो पोस्ट करत लिहिलं आहे,'सगळ्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना धन्यवाद!' तुम्ही तुमचं आयुष्य संकटात टाकता. खूप वेळ तुम्ही काम करता. तुमच्यामुळे रूग्णांना आराम देतो. कुटुंबापासून लांब राहतात. तुम्ही वास्तवात खूप शूर आहात. 



टीव्ही विश्वातील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ शुक्लाने 'बिग बॉस 13' सिझन आपल्या नावावर केलं. त्यानंतर 'खतरो के खिलाडी'मध्ये देखील त्याने विजय मिळवला. फक्त रियालिटी शो नाही तर सिद्धार्थने अनेक मालिकांमध्ये देखील महत्त्वाची भूमिका साकारली. 'बालिका वधू' मालिकेच्या माध्यमातून तो घरा-घरात पोहोचला आणि प्रेक्षकांच्या मनात त्याने घर केलं. चाहत्यांच्या मनात राज्य करणाऱ्या सिद्धार्थने अखेर जगाचा अखेरचा निरोप घेतला आहे.