मुंबई : 'बालिका वधू' मालिकेच्या माध्यमातून घरा-घरात पोहोचलेला अभिनेता सिद्धार्थ शुक्ला काळाच्या पडद्याआड गेला आहे. मालिका, रियालिटी शो, चित्रपटांच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आलेला सिद्धार्थ अनंतात विलीन झाला आहे. आपल्या अभिनयाने सिद्धार्थने प्रेक्षकांच्या मनात राज्य केलं पण अचानक सिद्धार्थ सर्वांच्या मनाला चटका लावून निघून गेला. आता सिद्धार्थ फक्त त्यांच्या कामाच्या माध्यमातून आपल्यात जिवंत असणार आहे. सिद्धार्थच्या निधनाची माहिती मिळताचं अनेक कलाकारांनी त्याच्या घराच्या दिशेने घाव घेतली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुरूवारी सिद्धार्थच्या निधनाची माहिती मिळाली आणि सर्वत्र शोककळा पसरली. सोशल मीडियावर जेथे पाहावं तेथे फक्त आणि फक्त सिद्धार्थ होता. 'बिग बॉस', 'खतरो के खिलाडी' या रियालिटी शोमध्ये झळकलेला खिलाडी सिद्धार्थ आपल्यापासून फार दूर एका वेगळ्या विश्वात कायमचा निघून गेला. सिद्धार्थचं निधन झालं  असलं तरी त्याची मेहनत आणि चिकाटी उभरत्या कलाकारांना प्रेरणा देणारी आहे. 



सिद्धार्थचा जन्म मुंबईत 12 डिसेंबर 1980 रोजी झाला.  एका मॉडेलच्या रूपात त्याने करियरला सुरूवात केली. त्यानंतर 2004 साली त्याने अभिनयात पदार्पण केलं. करियरच्या या प्रवासात सिद्धार्थ कधी थांबला नाही किंवा मागे वळून पाहिलं नाही, पण नियतीला काही वेगळचं मान्य होतं.....