मुंबई : बॉलिवूड कलाकारांना कायमच काही ना काही कारणाने युझर्स ट्रोल करत असतात. मात्र अनेक कलाकार युझर्सच्या ट्रोल्सकडे दुर्लक्ष करतात. हल्लीच अभिनेते अनुपम खेर आणि अभिनेत्री किरण खेर यांचा मुलगा सिकंदर खेर याने एका युझरला सडेतोड उत्तर दिलं आहे. सिकंदरने इंस्टाग्राम स्टोरीवर एका युझरचं नाव, कमेंट आणि आपला रिप्लाय असं शेअर केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झालं असं की, युझरने सिकंदर आणि त्याच्या मित्राच्या फोटोवर अतिशय वाईट कमेंट केली. सिकंदरने ही या युझरला त्याच्याच भाषेत सडेतोड उत्तर दिलं आहे. सिकंदर म्हणाला की,'स्पष्ट सांगायचं तर वर्झिन आहे, मी तिच्या वर्जिनिटीचा सन्मान करतो.' या प्रत्युत्तरासोबत अभिनेत्याने युझरच्या नावासोबत 'तुझे पालक तुझा अभिमान व्यक्त करत असतील.' अशी प्रतिक्रिया पोस्ट केली आहे. 



सिकंदरसारखेच असे काही कलाकार आहेत. जे युझरर्सला सडेतोड उत्तर देण्यात मागे पाहत नाहीत. अभिषेक बच्चन, तापसी पन्नू, नव्या नवेली नंदी, शाहिद कपूरसह अेक कलाकारांना ट्रोल केलं जातं. हे कलाकार युझरला प्रत्युत्तर देताना दिसतात. 


काही दिवसांपूर्वी सिकंदर खेर यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटर कॅन्सरग्रस्त किरण खेर यांची एक झलक दाखवली आहे. सिकेंदर खेर यांनी काही दिवसापूर्वी आपल्या आईच्या आजारपणाची माहिती दिली. त्यामध्ये किरण खेर यांना मल्टीपल मायलोमा आहे. हा प्रकार ब्लड कॅन्सरशी संबंधीत आहे. 


सिकंदर यांनी आपल्या आई-वडिलांसोबत म्हणजे अनुपम खेर आणि किरण खेरसोबत एक व्हीडिओ शेअर केला आहे. यावेळी किरण खेर काऊचवर बसल्याच्या दिसल्या. किरण खेर या खूप थकल्यासारख्या दिसत आहे. तसेच त्यांच्या हातावर एक पट्टी बांधली गेली आहे. पण त्यांनी आपल्या सगळ्या चाहत्या वर्गाचे खूप आभार मानले.