मुंबई : ' असं नेमकं काय झालं असेल की रोहित शेट्टी- रणवीर सिंह हे थेट हास्य अभिनेता सुनील ग्रोवरच्या अंगावर थुकले ?'... तुम्ही अजूनही व्हिडिओ पाहिला नसेल तर हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. 'कॉमेडी नाईट्स विथ कपील' मध्ये प्रेक्षकांना लोळून लोळून हसवणाऱ्या सुनील ग्रोवरचा नवा शो येतोय. स्टार प्लस वरील आगामी 'कानपुर वाले खुरानाज' शो मधून तो पुन्हा एकदा घराघरात दिसणार आहे. या शो च्या पहिल्याच एपिसोडमध्ये रोहित शेट्टी त्याच्या टीमला घेऊन आलाय. सिम्बाच्या प्रमोशसनाठी ही टीम कानपुर वाले खुरानाज' मध्ये आली आहे. या कार्यक्रमाचे प्रोमो समोर आले असून ते खूपच मजेशीर असून मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.


प्रोमो व्हायरल 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्टार प्लसने आपल्या ट्वीटर हॅंडलवरून एक प्रोमो अपलोड केलाय. या मजेशीर प्रोमोमध्ये रणवीर सिंह आणि रोहित शेट्टी सुनील ग्रोवरवर थुंकताना दिसत आहेत. रणवीर सिंह साठी सुगंधा मिश्रा चहा घेऊन येते. सुनील ग्रोव्हरवर तो चहाचा घोट थुंकतो. यानंतर रोहित शेट्टी देखील असंच करतो. यानंतर सुगंधा आणि फराहस खान देखील चहा पितात आणि सुनील वर थुंकतात. हे बघून कोणालाच स्वत:वरचं हसू आवरत नाही. हा प्रोमो सोशल मीडियात खूप व्हायरल झालाय. अनेकजण यावर आपली प्रतिक्रिया नोंदवत आहेत. अनेकांनी सुनील ग्रोव्हरला नव्या शोसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.



उद्या पासून सुरू


शो चा आणखी एक प्रोमो व्हायरल होतोय. यामध्ये सुनीलचे कॉमेडीयन मित्र रणवीरला घाबरवताना दिसत आहेत. त्यानंतर रोहित आणि फराह त्यांची खिल्ली उडवत आहेत. 'कानपुर वाले खुरानाज' उद्या 15 डिसेंबर पासून तुम्हाला पाहता येणार आहे.