मुंबई : रणवीर सिंह आणि सारा अली खानचा 'सिंबा' हा सिनेमा प्रदर्शित होऊन 10 दिवस झाले आहेत. सिनेमाने 10 दिवसांत 190 करोड रुपयांच कलेक्शन केलं आहे. 'सिंबा' नव्या वर्षात प्रेक्षकांच मनोरंजन करणारा सिनेमा ठरला आहे. फक्त एका दिवसाच्या कलेक्शननंतर हा सिनेमा 200 करोड रुपयांची कमाई करणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'सिंबा' सिनेमाने ओपनिंग डेटवर 20 करोड 72 लाख, शनिवारी 23 करोड 33 लाख, तिसऱ्या दिवशी 31 करोड 6 लाख रुपयांची कमाई केली आहे. चौथ्या दिवशी सिनेमाने भारतीय बाजारात 21.24 करोड रुपयांचा बिझनेस केला आहे. 5 व्या दिवशी या सिनेमाने 124 करोड रुपयांचा आकडा गाठला आहे. 


सिनेमाने दुसऱ्या आठवड्यात शुक्रवारी 9.02 करोड रुपये तर शनिवारी हे कलेक्शन वाढून 13.32 करोड रुपये कमाई आणि रविवारी हा सिनेमा 17.49 करोड रुपयांची कमाई केली आहे. अशाप्रकारे या सिनेमाने 190.64 करोड रुपयांची कमाई केली आहे. 


रोहित शेट्टीचा सिनेमा 'चेन्नई एक्सप्रेस' आणि 'गोलमाल अगेन'सोबत 'सिंबा' हा तारीख 200 करोड रुपयांचा आकडा गाठला आहे. 



हा सिनेमा रेकॉर्ड रचत आहे. 'सिंबा'2018 ची तिसरी सर्वात जास्त कलेक्शन करणारी सिनेमा ठरला आहे. संजूने बॉक्स ऑफिसवर 341 करोड, पद्मावतने 300 करोड रुपयांचा बिझनेस केला आहे. करण जोहरच्या प्रोडक्शनमध्ये बनलेली 'सिंबा'ही फिल्म ठरली आहे.