मुंबई  : सोशल मीडियावर एका मुलीचा फोटो समोर आला असून, तिला ओळखण्याचं आवाहन केलं जात आहे. आजच्या काळात करोडो लोकांच्या हृदयावर राज्य करणारी ही मुलगी बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. फोटोमध्ये तुम्ही बघू शकता की, अवघ्या काही महिन्यांची एक लहान मुलगी पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये खूप गोंडस स्माईल देत आहे. तुम्ही या मुलीला ओळखलं का? नसेल तर आता आम्ही तुम्हाला सांगतो ही अभिनेत्री कोण आहे. पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसणारी ही चिमुरडी दुसरी कोणी नसून 1994 मधील मिस वर्ल्ड ऐश्वर्या राय बच्चन आहे. आजच्या काळात बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. नुकताच ऐश्वर्या राय ४७वा वाढदिवस पार पडला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एश्वर्याच्या हा लहानपणीचा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी ऐश्वर्या राय मॉडेलिंग आणि जाहिरात चित्रपट करत होती. ती लहानपणी इतकी सुंदर होती की, तिला तिच्या शालेय दिवसातच मॉडेलिंगच्या ऑफर्स येऊ लागल्या होत्या. तिला पहिली ऑफर मिळाली तेव्हा ती 9वीत होती.


जशी एश्वर्या राय मिस वर्ल्ड बनली तशी तिला सिनेमाच्या ऑफर्स मिळू लागल्या. प्रत्येक दिग्दर्शक तिला आपल्या सिनेमात कास्ट करु ईच्छित होता. १९९७ मध्ये आलेला  मणिरत्नम  सिनेमातून डेब्यू केला. याच वर्षी अभिनेत्रीचा सिनेमा और प्यार हो यामध्ये दिसली. या दोघांचा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला.