मुंबई : टीव्ही रिअॅलिटी शो 'इंडियन आयडॉल'च्या पहिल्या पर्वाचा विजेता मराठमोळा अभिजीत सावंतला तुम्ही आजही विसरले नसालच... पण, अभिजीत आता सध्या कुठेय? आणि तो काय करतोय? हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल... तुम्ही जर अभिजीतचे आजही फॅन असाल तर आज त्याचा वाढदिवस आहे हे तुम्हाला माहित असेलच...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

७ ऑक्टोबर १९८१ हा अभिजीतचा जन्मदिवस... एका मध्यमवर्गीय मराठमोळ्या कुटुंबात अभिजीतचा जन्म झाला... अभिजीतनं प्रसिद्ध रिअॅलिटी शो 'इंडियन आयडॉल'च्या पहिल्या पर्वात सहभाग नोंदवला होता... आणि आपल्या अनोख्या शैलीनं तो या पर्वाचा विजेताही ठरला. १३० स्पर्धकांना मागे टाकत तो या ठिकाणी पोहचला होता. 



यानंतर अभिजीतनं यानंतर 'एशियन आयडॉल'मध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं... या स्पर्धेत त्याला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं होतं. 


२००५ साली इंडियन आयडॉल जिंकल्यानंतर 'आपका अभिजीत' नावानं त्याचा एक अल्बमही लॉन्च झाला होता. त्यानंतर आलेल्या 'जुनून' या अल्बमलाही प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला. 'आशिक बनाया आपने' या सिनेमासाठी अभिजीतनं 'मरजावा' हे गाणंही गायलं. 


इंडियन आयडॉलनंतर अभिजीत पत्नी शिल्पासोबत डान्स रिअॅलिटी शो 'नच बलिए'च्या सीझन ४ मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता. त्यानंतर मात्र तो दीर्घकाळ लाईमलाईटपासून दूर आहे.



यानंतर २०१० साली अभिजीत पुन्हा एकदा चर्चेत आला होता... सांताक्रूझ भागात आपल्या एका मैत्रिणीसोबत कारमधून प्रवास करत असताना एका स्कूटरला धडक दिल्यानंतर बराच वाद झाला होता. 


अभिजीत आणि शिल्पा या दाम्पत्याला आहना नावाची एक मुलगी आहे.