Adnan Sami Then and Now Look: संगीतकार अदनान सामीची गाणी प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. त्याने त्याच्या आवाजाने चाहत्यांच्या मनात एक खास स्थान निर्माण केलं आहे. त्यासोबत तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. सध्या अदनान सामी त्याच्या वजन कमी करण्याच्या प्रवासामुळे चर्चेत आला आहे. एकेकाळी अदनान सामीचे वजन 230 किलो होते. 2006 मध्ये त्याला डॉक्टरांनी चेतावणी दिली होती. जर वजन कमी केले नाही तर त्याच्याकडे फक्त 6 महिने शिल्लक असतील अशी चेतावणी डॉक्टरांनी त्याला दिली होती असं अदनानने सांगितले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डॉक्टरांनी दिला होता इशारा


अदनान सामीने ह्यूमन्स ऑफ बॉम्बेला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे की, 2006 मध्ये त्याला डॉक्टरांनी चेतावणी दिली होती. जर वजन कमी झाले नाही तर फक्त 6 महिने शिल्ल्क आहेत. त्यावेळी अदनान सामीचे वजन 230 किलो होते. जर हे वजन कमी नाही केलं तर पुढे काहीही होऊ शकत. त्यामुळे त्यांनी सांगितलेले उपाय करा किंवा मरा अशी परिस्थिती झाली होती. पण आता मी 130 किलो वजन कमी केले आहे. हे ऐकून लोकांना देखील आश्चर्य वाटेल की माझे वजन इतक्या लवकर कसे कमी झाले. 


अनेकांना वाटत होते की मी वजन कमी करू शकत नाही. हे मला देखील वाटत होते. कारण, हे माझ्यासाठी खूपच कठीण काम होतं. पण मी हार मानली नाही. मी एका न्यूट्रिशनिस्टची भेट घेतली. त्यांनी मला समजवलं. त्यानंतर मी हळू हळू वजन कमी करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आणि माझे वजन कमी झाले. 


अदनान सामीने कसं केलं 130 किलो वजन कमी? 


2022 मध्ये टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना अदनान सामीने त्याचे वजन कमी कसे झाले याबद्दल सांगितले आहेत. ज्यामध्ये तो हाय प्रोटीन डाएट घ्यायचा. त्यामध्ये त्याने भात, भाकरी, साखर आणि तेल खाल्ले नाही. हे त्याने पुढे सुरुच ठेवले आणि त्यानंतर त्याचे 130 किलो वजन कमी झाले. तो पुढे म्हणाला की, त्याने हे नियोजन केले नव्हते पण ते घडत गेले. आता तो त्याच्या खाण्याच्या सवयींबद्दल खूपच सावध असतो. त्यामुळे तो आता जास्त खात नाही.