लग्नाधीच `ती` सुपरस्टार गरोदर; बेबी बम्पसह प्रियकरासोबतचा फोटो पोस्ट करत दिली Goodnews
फोटोशूट तुफान व्हायरल
मुंबई : पुढे जाणाऱ्या काळासोबत काही समजुती आणि सामाजिक धारणाही बदलत आहेत. काही नात्यांनाही मोठ्या मनानं स्वीकारलं जात आहे. प्रेम करण्यासाठी किंवा सोबत आयुष्य जगण्यासाठी त्यावर लग्नाचा शिक्का मारणं गरजेचं नसतं, हेसुद्धा अनेकांनीच दाखवून दिलं.
अशाच काहीजणआंमध्ये एका लोकप्रिय नावाचा समावेश झाला. हे लोकप्रिय नाव आहे एका सेलिब्रिटीचं. जागतिक स्तरावर तिला प्रसिद्धी मिळाली आहे. असं असतानाच तिनं एक गोड बातमी सर्वांच्या भेटीला आणली.
आपण गरोदर असल्याचं सांगत तिनं प्रेगन्सेन्सी फोटोशूटमधील एक फोटोच समोर आणला. आठवड्याभरापूर्वी काढलेला फोटो पोस्ट करत 'कुणीतरी येणार गं...' सांगणारी ही सेलिब्रिटी आहे गायिका रिहाना.
रिहाना आणि तिचा प्रियकर, गायक- रॅपर रॉकी आता एका नव्या पाहुण्याच्या येण्यासाठी आतुर झाले आहेत.
रिहाना आणि रॉकीच्या या फोटोशूटमध्ये ती एका गुलाबी रंगाच्या कोटमध्ये दिसत आहे.
जिन्स आणि लांब कोट असा तिचा एकंदर लूक आहे. इथं तिच्या कोटला अशी सजावट आहे ज्यामधून तिच्या पोटाचा भाग तर दिसेलच. सोबतच तिच्या पोटावर मोत्यांचा सरही अलगद लोंबकळेल.
2020 मध्ये रिहाना आणि रॉकी यांच्या नात्याचा खुलासा झाला होता. 2021 मध्ये मेट गालाच्या रेड कार्रेटवरही ही जोडी एकत्र दिसली होती.
सूत्रांच्या माहितीनुसार रिहाना लोकप्रियतेसोबतच श्रीमंत गायिकांपैकी एक आहे. एका वर्षाला तिच्या कमाईचा आकडा 1.7 मिलिटन डॉलर म्हणजेच 12618.68 कोटी रुपये इतका सांगितला जातो.
फक्त संगीत क्षेत्रच नव्हे, तर सौंदर्यप्रसाधनांच्या कंपनीमुळंही रिहानाच्या उत्पन्नात मोठी भर पडते. कामात सतत व्यग्र असणारी रिहाना आता गरोदर असल्यामुळं येत्या काळात नव्या जबाबदाऱ्या ती कशी पार पाडते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.