मुंबई : कोरोना व्हायरसचा धोका दिवसागणिक वाढताना दिसत आहे. कोरोना ग्रस्त रुग्णांच्या मृतांच्या संख्येत वाढ होत आहे. फक्त सर्वसामान्य नाही तर लोकप्रिय कलाकारांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. आता एक मोठी धक्कादायक बातमी समोर येत आहे. ७६ वर्षीय गायक सीव्हा टकर यांचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे कलाविश्वातून त्याचप्रमाणे त्यांच्या चाहत्यांकडून शोक व्यक्त केला जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लिव्हरपूल ईकोच्या वृत्तानुसार गेल्या आठवड्यात त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं उघडकीस आलं होतं. ७५ वर्षीय टकर यांना मधुमेह आणि ह्रदय विकाराचा त्रास होता. शिवाय वयाच्या अनुशंगाने त्यांना अधिक धोका असल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं होतं. त्यांच्या अशा अचानक जाण्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.



'पती, वडिल, सासरे आणि आजोबा म्हणून ते फार प्रेमळ होते. संगीताच्या माध्यमातून  त्यांनी अनेकांचे मन जिंकले होते' अशा भावना त्यांच्या कुटुंबियांनी व्यक्त केल्या आहेत. दरम्यान करोना व्हायरसचा धोका वाढताना दिसत आहे.


कोरोनाच्या वाढत्या दहशतीमुळे अनेक राष्ट्रांकडून महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून स्वत:ची आणि कुटुंबाची काळजी घेणं फार महत्त्वाचं आणि गरजेचं आहे.