नवी दिल्ली :   २०१८ या एका वर्षातच इरफान खान आणि सोनाली बेंद्रे यांनी आपल्याला कॅंसर असल्याचे वृत्त सोशल मीडिया अकाऊंटवरून दिले. यानंतर त्यांच्या चाहत्यांना जबर धक्का बसला. यानंतर एका सेलिब्रेटीच कॅन्सर संदर्भातील ट्वीट वाचून चाहत्यांना आणखी एक धक्का बसला. आपल्या आवाजाने लाखोंच्या गळ्यातील ताईत बनलेल्या गायक लकी अली यांच ते ट्विट असल्याचे म्हटले जाते.  गुरूवारपासून या ट्वीटने हंगामा केला. हे ट्वीट खूप व्हायरल झाले. लकी अली यांनादेखील यासंदर्भात विचारणा करणारे खूप फोन कॉल्स आणि मेसेजेस आले.



इरफान आणि सोनालीचा कॅन्सर 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कॅन्सर या आजाराचे नाव ऐकलं तरीही अनेकांचा थरकाप उडतो. कॅन्सर हा त्रास जितका वेदनादायी आहे तितकेच त्याचे उपचारही त्रासदायक असतात. मात्र सकारात्मक दृष्टीकोनाने तुम्ही अवघड परिस्थितीमधूनही मार्ग काढू शकता. सध्या कॅन्सरशी सामना करणार्‍या सोनाली बेंद्रेचाही असाच सकारात्मक दृष्टीकोन तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.   आपल्या आजारावर उपचार करण्यासाठी अभिनेता इरफान खान लंडनमध्ये आहे. इरफान खानला न्यूरोएंडोक्राइन कॅन्सर झाला आहे.


काय आहे सत्यता ?


 हे ट्विट कॅंसरसारख्या दुर्धर आजाराशी संबधित आहे. 'डियर किमोथेरेपी, तू कधी शेवटचा पर्याय असू शकत नाहीस.'  'इंडिया टुडे'ने दिलेल्या वृत्तानुसार लकी अलीच्या या ट्विट बातमीत कोणतीही सत्यता नाही. सुत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार लकी अलीलला कोणता आजार झालेला नाही. ते ट्विट त्याच्या अधिकृत ट्विटरवरून केलं गेलं नव्हत. लकी अली पूर्णपणे फिट असल्याचेही त्यांनी सांगितले. लकी अली हे प्रसिद्ध अभिनेते मेहमूद यांचे पुत्र आहेत. त्यांनी गायकीसोबतच काही सिनेमात कामही केलंय.